परभणी : दारु दुकानात चोरी करणारे चौघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 12:04 AM2020-04-19T00:04:33+5:302020-04-19T00:04:49+5:30
गंगाखेड शहरातील एक दारुचे दुकाने फोडून देशी, विदेशी दारु चोरुन नेणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, गंगाखेड परभणी रस्त्यावरील हॉटेल चांगभलं बार हे हॉटेल बंद असताना चोरट्यांनी गोदामातील देशी, विदेशी दारुसह बीअरच्या बाटल्या चोरुन नेल्या होत्या. प्रकरणी १७ एप्रिल रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड या प्रकरणाचा तपास करीत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : गंगाखेड शहरातील एक दारुचे दुकाने फोडून देशी, विदेशी दारु चोरुन नेणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, गंगाखेड परभणी रस्त्यावरील हॉटेल चांगभलं बार हे हॉटेल बंद असताना चोरट्यांनी गोदामातील देशी, विदेशी दारुसह बीअरच्या बाटल्या चोरुन नेल्या होत्या. प्रकरणी १७ एप्रिल रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड या प्रकरणाचा तपास करीत होते.
या गुन्ह्याच्या संदर्भाने स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती संकलित केली. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि गंगाखेड तालुक्यातील महातपुरी या दोन ठिकाणावरुन मसाजी तुकाराम धोत्रे, सुनील तुकाराम धोत्रे (दोघे. रा.महातपुरी) व सूरज नितीन जाधव, सुखदेव मारोती पवार (दोघे रा.कारखाना वडरवस्ती वसमत) या दौघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता चौघांनीही गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच या ठिकाणावरुन चोरुन नेलेल्या एकूण दारुसाठ्यापैकी २४ हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासांमध्येच या गुन्ह्याची उकल केली आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक आर.रागसुधा, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शरद बिपट, सुरेश डोंगरे, सुग्रीव केंद्रे, मधुकर चट्टे, निलेश भुजबळ, संजय शेळके, सय्यद मोबीन, किशोर चव्हाण, हरि खुपसे, परमेश्वर शिंदे, विशाल वाघमारे, अरुण कांबळे यांच्या पथकाने केली.
दरम्यान, पकडलेल्या चारही आरोपींनी गंगाखेड शहराबरोबरच मुखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतही चोरी केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.