परभणी : भाजप सरकारकडून कामगारांची फसवणूक- चंद्रकांत महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:36 AM2018-06-18T00:36:02+5:302018-06-18T00:36:02+5:30
यदा दुरुस्तीच्या नावाखाली भाजप सरकारकडून कामगारांची संख्या घटवून त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आणण्याचे पाप केले जात आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी सभागृहात आवाज उठवून कामगारांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष चंद्रकांत महाडीक यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कायदा दुरुस्तीच्या नावाखाली भाजप सरकारकडून कामगारांची संख्या घटवून त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आणण्याचे पाप केले जात आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी सभागृहात आवाज उठवून कामगारांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष चंद्रकांत महाडीक यांनी येथे केले.
भारतीय कामगार सेना वीज युनिटच्या वतीने परभणी शहरातील अक्षदा मंगल कार्यालयात १७ जून रोजी राज्यव्यापी महाअधिवेशन पार पडले. यावेळी महाडीक बोलत होते.
अध्यक्षस्थानी शिवसेनेचे नेते तथा खा.चंद्रकांत खैरे यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून राजन भानुशाली, स्वागताध्यक्ष आ.डॉ.राहुल पाटील, डॉ.विवेक नावंदर, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, नंदू आवचार, ज्ञानेश्वर पवार, अनंत पाटील, अधीक्षक अभियंता यशवंत कांबळे, डॉ.संजय कच्छवे यांची उपस्थिती होती. खा.चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलाने अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले.
महावितरणचे प्रादेशिक संचालक तथा भूमिपुत्र सतीश गणपतराव करपे, भारतीय कामगार सेनेचे समन्वयक सल्लागार विठ्ठलसिंह परिहार, मॅरेथॉनपटू ज्योती गवते, शालेय क्रीडा स्पर्धा पदक विजेती सुनीता शिंदे व एव्हरेस्ट वीरांगना मनिषा वाघमारे यांच्या आई-वडिलांचा सत्कार करण्यात आला.
या अधिवेशनात संघटनेचे कार्याध्यक्ष राजन भानूशाली, प्रशांत शेंडे, सुभाष आंबवने, मारोतराव टाक यांनी वीज कामगारांच्या अडचणी मांडल्या. खा.चंद्रकांत खैरे म्हणाले, कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना कामगारांसोबत आहे. कामगारांच्या आंदोलनात अग्रभागी राहून कामगार संघटनेला साथ देण्याचे काम शिवसेनेने केले आहे. महावितरणचे वरिष्ठ अधिकारी व खाजगी कंपन्यांचे साटेलोटे असल्यामुळेच महावितरण घाट्यात टाकण्याचे काम होत आहे. त्यामुळे असे प्रकार हाणून पाडण्याचे काम कामगार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले पाहिजे. या अधिवेशनात कामगारांच्या प्रश्नावर झालेले ठराव लोकसभेच्या सभागृहात निश्चित मांडून त्यावर आवाज उठविण्याचे काम केले जाईल, असे आश्वासन खा.खैरे यांनी दिले.
आ.डॉ.राहुल पाटील म्हणाले, कामगारांना येणाºया अडचणीसंदर्भात येत्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या सभागृहात ठरावाच्या माध्यमातून आवाज उठवून न्याय देण्याचे काम शिवसेनेच्या वतीने केले जाईल. अभय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी विकास मिश्रा, प्रसाद सिंगणापूरकर, केशव धर्माधिकारी, प्रसन्न चामणीकर, जीवन मुंगळीकर, ईश्वर परडे, देविदास लांडगे, संतोष भांडारवाड, वैजनाथ कवडी, गजेंद्र राजूरकर, अविनाश चिटणीस, बाबू पुस्सा, योगेश सुदेवाड आदींनी प्रयत्न केले.