परभणी : पीकविमा मिळण्याचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:43 AM2018-07-18T00:43:03+5:302018-07-18T00:43:26+5:30
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गतवर्षीचा पीकविमा देण्यासंदर्भात झालेल्या चुका शासनाने मंगळवारी नागपूर येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत कबूल केल्या आहेत़ त्यामुळे गेल्या २१ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणाºया शेतकºयांच्या आंदोलनाला यश आले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गतवर्षीचा पीकविमा देण्यासंदर्भात झालेल्या चुका शासनाने मंगळवारी नागपूर येथे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत कबूल केल्या आहेत़ त्यामुळे गेल्या २१ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणाºया शेतकºयांच्या आंदोलनाला यश आले आहे़
गतवर्षीच्या खरीप हंगामातील पीक विमा देण्यासंदर्भात रिलायन्स विमा कंपनीने शेतकºयांवर अन्याय केल्याने संबंधित कंपनीच्या अधिकाºयांवर गुन्हे दाखल करावेत आणि शेतकºयांना पीक विमा देण्यात यावा, या मागणीसाठी २६ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी आंदोलन करीत आहेत़ या अनुषंगाने मंगळवारी नागपूर येथे राज्याचे कृषीमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक झाली़ या बैठकीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व शेतकºयांच्या शिष्टमंडळाने पीक विमा कंपनीच्या कारभाराचे पुराव्यासह वाभाडे काढले़ तसेच महसूल व कृषी विभागाच्या अधिकाºयांनीही कशा पद्धतीने चुकीची माहिती सादर केली, ज्यामुळे अन्याय झाला याबाबतचीही पुराव्यासह व्यथा मांडली़ केंद्र शासनाचा प्रधानमंत्री पीकविम्यासंदर्भातील निर्णय बाजुला ठेवून चुकीचे कसे निकष लावले? याबाबतचीही माहिती सांगण्यात आली़ त्यानंतर कृषीमंत्री पाटील यांनी राज्य शासनाच्या परिपत्रकात झालेली चूक कबूल केली़ तसेच परिपत्रकात बदल करून मंडळनिहाय सर्वेक्षणाचा निर्णय घेतला़ मागील वर्षी जो ५३ दिवसांचा पावसाचा खंड होता, तो देखील ग्राह्य धरून त्याची नोंद घेण्यात आली़ तसेच जे उंंबरठा उत्पन्न सात वर्षांचे केले जाते़ त्यात दोन वर्षे जरी पर्जन्यमान चांगले झाले असले तरी पाच वर्षांत सरासरी उत्पन्न पूर्णत: घटले आहे़ याचाही यावेळी सकारात्मक विचार करण्यात आला़ त्यानंतर झालेल्या चर्चेअंती कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकºयांना लवकरच पीकविमा मिळेल, असे सांगितले़ या बैठकीस आ़ डॉ़ राहुल पाटील, आ़ विजय भांबळे, आ़ डॉ़ मधुसूदन केंद्रे, आ़ विप्लव बाजोरिया, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, माजी आ़ विजय गव्हाणे, कृषीचे मुख्य सचिव विजयकुमार, कृषी आयुक्त एस़पी़सिंह, कॉ़ राजन क्षीरसागर, कॉ़ विलास बाबर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, जि़प़ सदस्य डॉ़ सुभाष कदम, श्रीनिवास जोगदंड, सुभाष जावळे, रवि पतंगे, गणेश रोकडे, प्रविण देशमुख, भाऊसाहेब गिराम, विठ्ठलराव दुधाटे, विश्वंभर गोरवे, शिवाजी दुधाटे व रिलायन्स कंपनीचे अधिकारी उपस्थित होते़
शेतकºयांच्या सर्व मागण्या मान्य-पाटील
परभणी जिल्ह्यातील शेतकºयांच्या पीक विम्याच्या प्रश्नावर तोडगा निघाला आहे़ या संदर्भात आपण नागपूरच्या अधिवेशनात आंदोलन केले होते़ त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेल्या आठवड्यात भेट घेऊन त्यांना पीकविम्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी केली होती़ त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी कृषीमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते़ त्यानुसार जिल्ह्यातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाला सोबत घेऊन मंगळवारी नागपुरात बैठक झाली़ या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला आहे़ शासनाने आपली चूक कबूल केली आहे़ त्यामुळे लवकरच शेतकºयांना त्यांच्या हक्काचा पीक विमा मिळणार आहे़ शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यास आपले नेहमीच प्राधान्य राहिले असून, पीक विम्याचाही प्रश्न सोडविण्यात यश मिळाले, यात आपले समाधान आहे़
शेतकºयांच्या हक्काचा पीकविमा - विजय भांबळे
जिल्ह्यातील शेतकºयांना त्यांच्या हक्काचा पीकविमा मिळावा, यासाठी आपण नागपुरात आंदोलन केले़ त्यानंतर गेल्या आठवड्यात विधानसभेत २९३ प्रस्तावांतर्गत मुद्दा उपस्थित केला़ त्याची तत्काळ शासनाने दखल घेतली़ त्यानंतर कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात मंगळवारी बैठक झाली़ त्यात सकारात्मक निर्णय झाला़ त्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांना पीकविमा मिळणार आहे़ यापुढील काळातही शेतकºयांच्या प्रश्नांवर वेळोवेळी आवाज उठविला जाईल व त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यात येतील, असे आ़ विजय भांबळे यांनी सांगितले़