परभणी : डीवायएसपींच्या विरोधात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:37 AM2018-11-29T00:37:41+5:302018-11-29T00:37:58+5:30
गौतमनगर येथे कोम्बींग आॅपरेशन करताना महिला, अबालवृद्धांना मारहाण केल्या प्रकरणी उपविभागीय अधिकारी परदेशी यांच्याविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी गौतमनगर येथून निषेध मूक मोर्चा काढण्यात आला़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : गौतमनगर येथे कोम्बींग आॅपरेशन करताना महिला, अबालवृद्धांना मारहाण केल्या प्रकरणी उपविभागीय अधिकारी परदेशी यांच्याविरुद्ध कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी गौतमनगर येथून निषेध मूक मोर्चा काढण्यात आला़
रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा काढण्यात आला. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गौतमनगर येथून निघालेला मोर्चा सुपर मार्केट, वसंतराव नाईक यांचा पुतळा, वसमत रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. या ठिकाणी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करताना विजय वाकोडे म्हणाले, गौतमनगरात पोलीस उपअधीक्षक संजय परदेशी यांनी केलेली कारवाई निषेधार्ह आहे़ त्यांना त्वरित निलंबित करावे, अन्यथा आंबेडकरी जनतेचा उदे्रक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला़ यावेळी प्रा़प्रवीण कनकुटे, सिद्धार्थ भराडे, रणजीत मरकंद, जाकेर कुरेशी, सुशील कांबळे, नागेश सोनपसारे, महेंद्र सानके, रवि पेदापल्ली, धर्मराज चव्हाण, अरुण लहाने, पवनकुमार शिंदे, उमेश लहाने, प्रशांत तळेगावकर, चंद्रकांत बनसोडे, चंद्रकांत लहाने, सुधीर कांबळे, आशाताई मालसमिंदर, वंदना जोंधळे आदींनी मनोगत व्यक्त केले़ त्यानंतर जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
मोर्चात आकाश लहाने, प्रदीप वाव्हळे, अशिष वाकोडे, यशवंत खाडे, संजय लहाने, संजय सारणीकर, राहुल कांबळे, राहुल भराडे, संजय भराडे, राहुल मकरंद, शेषराव जल्हारे, सिद्धार्थ कसारे, धीरज कांबळे यांच्यासह बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते़ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता़