परभणी : पोलीस निरीक्षकांच्या विरोधात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:16 AM2019-01-30T00:16:54+5:302019-01-30T00:18:08+5:30

अखंड हरिनाम सप्ताह खंडित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस निरीक्षकांना निलंबित करावे, या मागणीसाठी २९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गंगाखेड येथील तहसील कार्यालयावर वारकºयांनी मोर्चा काढला. टाळ, मृदंगाचा गजर करीत निघालेल्या या मोर्चात वारकरी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

Parbhani: Front against police inspector | परभणी : पोलीस निरीक्षकांच्या विरोधात मोर्चा

परभणी : पोलीस निरीक्षकांच्या विरोधात मोर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी): अखंड हरिनाम सप्ताह खंडित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस निरीक्षकांना निलंबित करावे, या मागणीसाठी २९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गंगाखेड येथील तहसील कार्यालयावर वारकºयांनी मोर्चा काढला. टाळ, मृदंगाचा गजर करीत निघालेल्या या मोर्चात वारकरी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरातील अखंड हरिनाम सप्ताहामध्ये लावलेल्या ध्वनिक्षेपकाचा आवाज कमी करण्याच्या कारणावरून गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोहन माछरे व इतर कर्मचाºयांनी अरेरावी केली. तसेच हरिनाम सप्ताह बंद करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराच्या निषेधार्थ अखिल भारतीय वारकरी संप्रदायाच्या वतीने मंगळवारी हा मोर्चा काढण्यात आला.
येथील संत जनाबाई मंदिरापासूून दुपारी १२ वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. टाळ, मृदंगाचा गजर करीत आणि अभंग गात शहराच्या मुख्य रस्त्याने हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. मोर्चात सहभागी वारकरी संप्रदायातील वारकºयांनी पोलीस निरीक्षकांच्या निषेधाच्या व धिक्काराच्या घोषणा दिल्या.
या ठिकाणी विविध गावांमधील महाराजांनी आपल्या भावना व्यक्त करून घडलेला प्रकार निदंनीय आहे, तो पुन्हा घडू नये, अशी मागणी केली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी विश्वंभर गावंडे यांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चामध्ये खा. बंडू जाधव यांच्यासह रासपाचे रत्नाकर गुट्टे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, बाजार समितीचे सभापती बालासाहेब निरस, ह.भ.प. माऊली महाराज मुडेकर, नाथराव महाराज इसादकर, केशव महाराज पालमकर, भगवान महाराज इसादकर, जि.प. सदस्य डॉ. सुभाष कदम, माणिक महाराज नाव्हेकर, गिरीश सोळंके, तुषार गोळेगावकर, गोविंद यादव, बालाजी चोरघडे, नानासाहेब सातपुते, भास्कर काळे, कृष्णा भोसले, अशोकराव भिसे, माधव शिंदे, सखूबाई लटपटे, ज्ञानेश्वर जाधव, धनंजय भेंडेकर, सुनीता घाडगे, ममता पैठणकर, विष्णू मुरकुटे, बोबडे महाराज, साहेबराव भोसले, जितेश गोरे आदींसह वारकरी संप्रदायातील भक्तगण, वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
नेमके काय घडले होते?
शहरातील ईसाद रोडवरील रामेश्वरनगरात श्री संत मोतीराम महाराज व गुरूवर्य मारोती महाराज गुरू-शिष्य मंदिराचे भूमिपूजन आणि मारोतराव महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या नवीन वास्तुच्या वास्तुशांती कार्यक्रमानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथा सोहळ्याचे आयोजन केले होेते.
२५ जानेवारी रोजी रात्री पोलीस निरीक्षक सोहन माछरे व इतर चार कर्मचाºयांनी कीर्तन सुरू असताना या ठिकाणी प्रवेश केला. ध्वनिक्षेपकाचा आवाज का कमी करीत नाहीस, या कारणावरून साऊंड सिस्टीमचालकासोबत अरेरावी केली, असा आरोप करीत पोलीस निरीक्षक व सोबतच्या कर्मचाºयांना निलंबित करावे, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला.

Web Title: Parbhani: Front against police inspector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.