परभणी : स्वतंत्र विद्युत रोहित्रासाठी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:50 AM2019-09-17T00:50:48+5:302019-09-17T00:51:39+5:30
शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील हाजी हामीद कॉलनीत स्वतंत्र विद्युत रोहित्र देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी रहिवाशियांनी १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील हाजी हामीद कॉलनीत स्वतंत्र विद्युत रोहित्र देऊन वीज पुरवठा सुरळीत करावा, या मागणीसाठी रहिवाशियांनी १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला.
शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील हाजी हामीद कॉलनीमध्ये मजहरबाबा डीपी क्रमांक ७२२ वर सुरळीत वीजपुरवठा होत नसल्यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. त्याच बरोबर या ठिकाणी दोन विद्युत पोलची आवश्यकता असताना केवळ एकाच विद्युत पोलावरुन जवळपास ४० ते ५० वीज जोडण्या आहेत. तसेच २०० ते २५० फुटावरुन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे थोडासा वारा किंवा पाऊस झाला तर वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे रात्र- रात्र हाजी हमीद कॉलनीतील रहिवाशियांना अंधारात काढावी लागत आहे. याबाबत अनेक वेळा वीज कर्मचाऱ्यांकडे गाºहाणे मांडूनही उपयोग होत नसल्याने या रहिवाशियांनी १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शहर वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढला. या ठिकाणी उपस्थित असलेल्या कार्यकारी अभियंता लोंढे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
यामध्ये स्वतंत्र विद्युत रोहित्र देण्यात यावे, जुनाट झालेल्या वीज तारा, वाकलेले खांबे दुरुस्त करुन देण्यात यावेत, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा आदी मागण्या निवेदनामध्ये करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर शकील मोहियोद्दीन, रहीम अन्सारी, शेख नबाब, शेख अकबर, तहसीन अन्सारी, बानो बेगम, नुरजहाँ बेगम, सिद्दीका बेगम, फर्जना बेगम, रबिया बेगम, नुसरत बेगम, रजिबा बेगम, रेहाना बेगम, नजमाबी, नसरीन बेगम, खैरोनीसा बेगम, शबाना बेगम, रेहाना बेगम, आरेफा बेगम यांच्यासह रहिवाशियांच्या स्वाक्षºया आहेत. येत्या काही दिवसात योग्य निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही मोर्चेकऱ्यांनी दिला.
दरम्यान, वीज वितरण कंपनी शहरासह ग्रामीण भागात सुरळीत वीज पुरवठा व्हावा, यासाठी अनेक उपक्रम, योजना राबवित आहे; परंतु, परभणी शहरातीलच नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी मोर्चा काढावा लागत आहे. त्यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा होण्यासाठी दुरुस्ती करावी तसेच स्वतंत्र डीपी देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी मोर्चेकºयांच्या वतीने ‘लोकमत’शी बोलताना करण्यात आली.