परभणी : वाळूसाठी जिंतूर तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:41 AM2018-11-17T00:41:31+5:302018-11-17T00:41:46+5:30

वाळूधक्के बंद असल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी जिंतूर येथे दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

Parbhani: Front for Jantoor Tehsil on sand | परभणी : वाळूसाठी जिंतूर तहसीलवर मोर्चा

परभणी : वाळूसाठी जिंतूर तहसीलवर मोर्चा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी) : वाळूधक्के बंद असल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी जिंतूर येथे दुपारी ३ वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
शहरातील बांधकाम मजूर, गुत्तेदार, सेंट्रींग मजूर, मिस्त्री यांच्या वतीने १६ नोव्हेंबर रोजी टिपू सुलतान चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसील परिसरात आयोजित सभेत जमीयतचे मराठवाडा अध्यक्ष मुफ्ती कलीम बेग यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, तालुक्यातील बोटावर मोजता येतील, असे दोन-चार जण महसूल व पोलीस प्रशासनाच्या वरदहस्तामुळे मध्यरात्रीच्या सुमारास नदीपात्रातून वाळूचा बेसुमार उपसा करून ती चढ्याने दराने विक्री करीत आहेत. बांधकाम व्यवसाय एक ते दीड वर्षापासून ठप्प झाला आहे. त्यामुळे मजूर, गुत्तेदार व या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांवर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मजुरांच्या सहनशिलतेचा अंत पाहता त्वरित वाळू धक्के सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर अ.रशीद, खालेद गुत्तेदार, शब्बीर गुत्तेदार, बाबूराज आदींची भाषणे झाली.
त्यानंतर नायब तहसीलदार गावंडे यांनी मोर्चास्थळी येऊन आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले. या आंदोलनात नगरसेवक कपील फारोखी, शाहेद बेग मिर्झा, शेख इस्माईल, अहेमद बागवान, फेरोज खॉ पठाण यांच्यासह मजूर मोठ्या संख्येने सहभागी झाले होेते.

Web Title: Parbhani: Front for Jantoor Tehsil on sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.