परभणी : पूर्णेत १३८५ एलईडी दिव्यांचा लखलखाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 12:59 AM2019-02-06T00:59:07+5:302019-02-06T00:59:25+5:30

शहरातील जुने पथदिवे बदलून त्याठिकाणी एलईडी दिवे बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत विविध भागांत १ हजार ३८५ नवीन एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत.

Parbhani: Full size of 1385 LED lights | परभणी : पूर्णेत १३८५ एलईडी दिव्यांचा लखलखाट

परभणी : पूर्णेत १३८५ एलईडी दिव्यांचा लखलखाट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा: शहरातील जुने पथदिवे बदलून त्याठिकाणी एलईडी दिवे बसविण्याचे काम प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत विविध भागांत १ हजार ३८५ नवीन एलईडी दिवे बसविण्यात आले आहेत.
शासनाच्या एनर्जी इफीसिइन्स सर्व्हिसेस मार्फत शहरात नवीन पथदिवे बसविण्यात येत आहेत. या कंपनीने आतापर्यंत शहरातील मुख्य रस्त्यांसह कॉलनीतील रस्ते व इतर परिसरात १८ वॅटचे ११८०, ३५ वॅटचे १४०, ७० वॅटचे ५० तर ४५ वॅटचे १५ पथदिवे बसविण्यात आले आहेत. शहरातील शिवाजी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, जामा मशिद परिसरात प्लड लाईट बसविण्याची प्रक्रिया सुरु आहे. रस्त्यावरील बदललेल्या दिव्यांमुळे एरव्ही अंधारात असलेले रस्ते रात्रीच्या वेळी झळाळून गेले आहेत. पथदिवे बदलल्यामुळे वीज बिलाची दरमाह कपात होणार आहे.
पुढील ७ वर्षे या पथदिव्यांच्या दुरुस्ती आणि सुधारणेची जबाबदारी तसेच पथदिवे लावणे व बंद करणे करणे संबंधित कंत्राटदाराकडे राहणार आहे.
वीज बिलात होणार कपात
४शहरात बसविण्यात आलेल्या पथदिव्यापोटी वीज वितरण कंपनीकडून मोठ्या प्रमाणात वीज देयके येत होते; परंतु, एलईडी पथदिव्यांमुळे वीज बिलात कपात होणार आहे. त्याच बरोबर रस्ते झळाळणार आहेत.
पथदिव्यांसाठी ५० विद्युत मीटर जोडणीची मागणी
४शहरातील पथदिव्यांना विद्युत पुरवठा करण्यासाठी यापूर्वी महावितरणकडून ११ मीटर जोडणी देण्यात आली होती. सद्यस्थितीत केवळ ५ मीटर सुरु आहेत. पालिका प्रशासनाला नवीन पथदिव्यांसाठी शहरात एकूण ५० मीटर जोडणीची आवश्यकता असून तशी लेखी मागणी वीज वितरण कंपनीकडे करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांनी दिली.

Web Title: Parbhani: Full size of 1385 LED lights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.