परभणी : निराधारांसाठी सवा कोटींचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:26 AM2019-04-27T00:26:38+5:302019-04-27T00:27:25+5:30
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योेजनेंतर्गत जिल्ह्यातील ११ हजार ९७३ लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाने १ कोटी १६ लाख ६० हजार ४६८ रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योेजनेंतर्गत जिल्ह्यातील ११ हजार ९७३ लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाने १ कोटी १६ लाख ६० हजार ४६८ रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांसाठी दरमाह निधीचे वितरण केले जाते. या अंतर्गत परभणी जिल्ह्यात ४ हजार २२ लाभार्थी असून त्यांना एप्रिल, मे, जून आणि जुलै या चार महिन्यांच्या अनुदानापोटी ४६ लाख ८२ हजार २३६ रुपये राज्य शासनाने मंजूर केले आहेत. याशिवाय श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७ हजार ९५१ लाभार्थ्यांसाठी एप्रिल, मे, जून व जुलै या चार महिन्यांकरीता ६९ लाख ७८ हजार २३२ रुपये मंजूर केले आहेत. हा सर्व निधी जिल्हा प्रशासनाकडे वितरित करण्यात आला आहे. लाभार्थ्यांच्या खात्यावर तो टप्प्याटप्प्याने वितरित केला जाणार आहे.
लातूर जिल्ह्यात श्रावणबाळचे सर्वाधिक लाभार्थी
४श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेंतर्गत मराठवाड्यात सर्वाधिक म्हणजे ३७ हजार ३३२ लाभार्थी लातूर जिल्ह्यात असून त्या खालोखाल २७ हजार २१४ लाभार्थी बीड जिल्ह्यात आहेत.
४याशिवाय हिंगोली जिल्ह्यात १७ हजार ४२२, जालना जिल्ह्यात ११ हजार ७७६, नांदेड जिल्ह्यात १३ हजार ३६७, औरंगाबाद जिल्ह्यात ११ हजार ३६४ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ८४७ लाभार्थी आहेत.