परभणी : मूर्ती विटंबनेच्या निषेधार्थ गंगाखेड बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:20 AM2019-01-17T00:20:39+5:302019-01-17T00:21:33+5:30

अहमदनगर जिल्ह्यातील भाळवणी येथे राष्ट्र संत भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटबंना झाल्याच्या घटनेचा निषेध नोंदवत १६ जानेवारी रोजी गंगाखेड शहर बंद पुकारण्यात आला़ या बंदला दिवसभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़

Parbhani: Gangakhed bandhana protesting against idol idol | परभणी : मूर्ती विटंबनेच्या निषेधार्थ गंगाखेड बंद

परभणी : मूर्ती विटंबनेच्या निषेधार्थ गंगाखेड बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : अहमदनगर जिल्ह्यातील भाळवणी येथे राष्ट्र संत भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटबंना झाल्याच्या घटनेचा निषेध नोंदवत १६ जानेवारी रोजी गंगाखेड शहर बंद पुकारण्यात आला़ या बंदला दिवसभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला़
भाळवणी येथे समाजकंटकांनी संत भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटबंना केल्याची घटना घडली होती़ या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत़ बुधवारी गंगाखेडमध्ये संत भगवान बाबा यांच्या भक्तांनी बंद पुकारला़ सकाळी १० वाजेच्या सुमारास भगवती चौक येथून मोर्चा काढण्यात आला़ डॉ़ हेडगेवार चौक, शहीद भगतसिंग चौक, राजमाता अहिल्याबाई होळकर चौक, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौक, पोलीस स्टेशनमार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचला़ नायब तहसीलदार किरण नारखेडे यांना निवेदन देण्यात आले़
यावेळी समाजकंटकांवर कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली़ या प्रसंगी संदीप केंद्रे, संजय कातकडे, जनार्दन आंधळे, रामराव फड, जगन्नाथ आंधळे, विजय मुंडे, महादेव फड, विष्णू मुरकुटे, हरिभाऊ सानप, मोहन पाळवदे, राम मुसळे, के़बी़ भेंडेकर, दीपक मुरकुटे, सिद्धेश्वर नागरगोजे, बालाजी मुंडे, प्रशांत फड, बालासाहेब पारवे, तुकाराम तांदळे, गोविंद लटपटे, अ‍ॅड़ संदीप पाठक, अ‍ॅड़ उमाकांत फड, राजेश मुंडे, वैजनाथ पाळवदे, संदीप लटपटे, स्वप्नील मुंडे, नाना चाटे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने बंदमध्ये सहभागी झाले होते़ बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते़

Web Title: Parbhani: Gangakhed bandhana protesting against idol idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.