परभणी : बोरीत गॅस्ट्रोचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 12:37 AM2019-08-21T00:37:04+5:302019-08-21T00:37:46+5:30

मागील १५ दिवसांपासून गावात गॅस्ट्रो या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे़ जुलाब आणि उलटीचा त्रास असणारे दररोज १० ते १५ रुग्ण ग्रामीण रुग्णालयात दाखल होत असल्याने आरोग्य विभागासमोर आव्हान उभे टाकले आहे़

Parbhani: Gastro Thaman in Bora | परभणी : बोरीत गॅस्ट्रोचे थैमान

परभणी : बोरीत गॅस्ट्रोचे थैमान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी): मागील १५ दिवसांपासून गावात गॅस्ट्रो या साथीच्या आजाराने थैमान घातले आहे़ जुलाब आणि उलटीचा त्रास असणारे दररोज १० ते १५ रुग्ण ग्रामीण रुग्णालयात दाखल होत असल्याने आरोग्य विभागासमोर आव्हान उभे टाकले आहे़
दीड महिन्यांपासून बोरी परिसरात मोठा पाऊस झाला नाही़ वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार वाढत आहेत़ मागील काही दिवसांपासून गॅस्ट्रोची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे़ येथील ग्रामीण रुग्णालयास भेट दिली असता, १० ते १२ रुग्ण उपचार घेऊन घरी परत गेल्याची माहिती मिळाली़ २० आॅगस्ट रोजी ५ रुग्ण दवाखान्यात उपचार घेत असल्याचे दिसून आले़ त्यामध्ये सुनिता चव्हाण, कोमल चौधरी, यशोदा चव्हाण, शांताबाई काबरा, यास्मीन शेख, सना शेख, स्मृती अंभुरे, सगुना चौधरी, अमोल राजूरकर, फरजाना शेख, गौस शेख, अंजली पवार, मीरा शिंपले हे रुग्ण उपचार घेऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले़ वैद्यकीय अधिकारी डॉ़ शुभांगी चव्हाण, डॉ़ उर्मिला फुलगोमे यांनी रुग्णांवर उपचार केले़ बोरी येथे १५ दिवसांपासून गॅस्ट्रोने रुग्ण त्रस्त आहेत़ तसेच सर्दी, खोकला, तापीचे रुग्णही वाढत आहेत़ अशा परिस्थिती आरोग्य सेवकांनी घरोघरी जाऊन पाण्याचे नमुने तपासून रुग्णांवर प्राथमिक उपचार करणे गरजेचे असताना तीन महिन्यांपासून आरोग्य सेवक फिरकला नाही़ आरोग्य विभागाने याकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे़
अधीक्षक गैरहजर
४बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात जिंतूर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ़ व्ही़ आऱ चांडगे यांची नेमणूक करण्यात आली आहे़ मात्र डॉ़ चांडगे हे रुग्णालयात उपस्थित राहत नाहीत़ त्यामुळे कर्मचारी व इतर डॉक्टरांवर कोणाचाही अंकुश राहिला नसल्याने ग्रामीण रुग्णालयाचा कारभार ढेपाळला आहे़ बोरी येथे कायमस्वरुपी वैद्यकीय अधीक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी रुग्णांमधून होत आहे़

Web Title: Parbhani: Gastro Thaman in Bora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.