परभणी : मुलीला पळविणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 12:24 AM2018-05-07T00:24:09+5:302018-05-07T00:24:09+5:30
शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळविणाºया आरोपीस पोलिसांनी ६ मे रोजी गंगाखेड रेल्वेस्थानकावरुन ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आरोपीच्या आई विरुद्धही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : शहरातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळविणाºया आरोपीस पोलिसांनी ६ मे रोजी गंगाखेड रेल्वेस्थानकावरुन ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आरोपीच्या आई विरुद्धही गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शहरातील वेताळ गल्लीतील एका अल्पवयीन मुलीस पळवून नेल्या प्रकरणी नगरेश्वर गल्लीतील कृष्णा ज्ञानेश्वर अय्या याच्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात ३ मे रोजी गुन्हा नोंद झाला होता. यातील आरोपी फरार झाला होता. हा आरोपी ६ मे रोजी गंगाखेड येथील रेल्वेस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरुन सहायक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात, पोलीस कर्मचारी निलेश जाधव, ओम वाघ, संदीप पांचाळ आदींनी रेल्वेस्थानक परिसरात सायंकाळी ७.३० वाजता सापळा लावला. यावेळी कृष्णा अय्या हा आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलिसांनी कृष्णा अय्या यास अटक केली असून विनयभंगाच्या कलमासह पोस्कोचे कलम वाढविण्यात आले आहेत. तसेच अल्पवयीन मुलीस पळवून नेण्यासाठी मदत केल्या प्रकरणी कृष्णा अय्या याच्या आईविरुद्धही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, पीडित मुलगी ५ मे रोजी रात्री ८ वाजता पोलीस ठाण्यात हजर झाली. वैद्यकीय तपासणीसाठी तिला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, येथील डॉक्टरांनी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केल्याने शनिवारी वैद्यकीय तपासणी होऊ शकली नाही. वैद्यकीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणखी कलम वाढू शक्यते अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात यांनी दिली.