परभणी : बालसुधारगृहातील मुलीचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:39 AM2018-04-28T00:39:53+5:302018-04-28T00:39:53+5:30
येथील बालसुधारगृहात दोन दिवसांपूर्वी दाखल केलेल्या १६ वर्षीय मुलीने भिंतीवरुन उडी घेऊन पलायन केल्याची घटना २७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : येथील बालसुधारगृहात दोन दिवसांपूर्वी दाखल केलेल्या १६ वर्षीय मुलीने भिंतीवरुन उडी घेऊन पलायन केल्याची घटना २७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
परभणी येथील नानलपेठ पोलिसांनी २५ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास गंगाखेड येथील कल्पना चावला मुलींच्या बालसुधारगृहात एका १६ वर्षीय मुलीला दाखल केले होते. २७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास या मुुलीने सोबत असलेल्या मुलीला धक्का देऊन सुधारगृहाच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारुन पलायन केले. आजूबाजूच्या मुलींनी आरडाओरड केल्यानंतर बालसुधारगृहातील कर्मचाऱ्यांनी तिचा पाठलाग केला. बसस्थानक, रेल्वेस्थानक, बाजारपेठ आदी ठिकाणी शोधही घेतला. मात्र ती मिळून आली नाही. बालसुधारगृहाच्या अध्यक्षा चित्राताई काशिनाथ दुधाटे यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक रवि मुंडे, गणेश वाघ तपास करीत आहेत.