परभणी : गोदाकाठचा ऊसपट्टा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 12:50 AM2019-01-06T00:50:57+5:302019-01-06T00:51:12+5:30

तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी डिग्रस बंधाऱ्यातून यावर्षी नांदेडला सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे गोदाकाठचा ऊसपट्टा धोक्यात आला असून ५ हजार हेक्टरवरील ऊस पाण्याअभावी मोडून टाकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.

Parbhani: The Godavari Rustic Threat | परभणी : गोदाकाठचा ऊसपट्टा धोक्यात

परभणी : गोदाकाठचा ऊसपट्टा धोक्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी) : तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रातील पाणी डिग्रस बंधाऱ्यातून यावर्षी नांदेडला सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे गोदाकाठचा ऊसपट्टा धोक्यात आला असून ५ हजार हेक्टरवरील ऊस पाण्याअभावी मोडून टाकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.
डिग्रस बंधाºयातील पाणीसाठा नेहमीच शेतकºयांसाठी टांगती तलवार बनला आहे. नांदेडसाठी कधी पाणी नेले जाईल, याचा नेम राहिला नाही. दरवर्षी मार्च महिन्यात पाणी पळविले जाते. मात्र यावर्षी प्रशासकीय यंत्रणेच्या वरदहस्ताने डिसेंबर महिन्यातच पाणी सोडण्यात आले आहे. या पाणीसाठ्याच्या विश्वासावर गोदाकाठच्या शेतकºयांनी लाखो रुपये खर्च करुन ऊस लागवड केली आहे. हा भाग शुगर बेल्ट म्हणून ओळखला जावू लागला. मात्र अचानक २२ डिसेंबर रोजी डिग्रस बंधाºयातून २० दलघमी पाणी नांदेडला सोडण्यात आल्याने गोदावरी नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. मागील वर्षी लागवड केलेल्या उसाला पुढील काळात पाणी उपलब्ध होणे मुश्कील झाले आहे. शेतातील ऊस, कारखान्यांना देऊन या पिकावर नांगर फिरविण्याची तयारी शेतकºयांनी केली आहे. पाणी नसल्याने ऊस मोडल्यामुळे लागवडीमध्ये मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. पालम तालुक्यातील डिग्रस, फरकंडा, जवळा, गुळखंड, फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड, उमरथडी, धनेवाडी, खुर्लेवाडी, रावराजूर, सावंगी ही तेरा गावे तर पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे, मुंबरे, महागाव, कळगाव, गोळेगाव, देऊळगाव, देवठाणा, वझूर आदी २१ गावांतील शिवारात उभ्या असलेल्या उसाच्या पिकाला धोका निर्माण झाला आहे. राजकीय व प्रशासकीय धोरणाचा शेतकºयांना दगाफटका बसला आहे.
उत्पादकांना मदतीची गरज
४उसाच्या पिकासाठी शेतकºयांनी मशागत, उसाचे बेणे, रासायनिक खत, मजुरी यावर लाखो रुपयांचा खर्च केलेला आहे. हे पीक दोन वर्षे उत्पादन देते म्हणून शेतकºयांनी मागील वर्षी लागवड केलेल्या उसातून उत्पादन खर्चही निघने कठीण बनले आहे. पाण्याअभावी ऊस मोडावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकºयांना आर्थिक मदत देणे गरजेचे आहे.
शेतकरी हवालदिल
४बंधाºयातील पाणीसाठ्याच्या भरोस्यावर शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली होती; परंतु, डिग्रस बंधाºयातून अचानक पाणी सोडल्याने शेतकºयांवर मोठे संकट कोसळले आहे. अगोदरच खरीप व रबी हंगामातील पिकांनी धोका दिला आहे. उसाचे पीक चार पैसे मिळवून देईल, ही आशा होती. मात्र पाणी सोडल्याने यावरही पाणी फेरले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून प्रशासकीय यंत्रणेवर प्रचंड नाराज झाला आहे.

Web Title: Parbhani: The Godavari Rustic Threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.