परभणी : ‘गुडबाय प्लास्टिक’चे पत्रक व्यापाऱ्यांना दिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 12:37 AM2019-10-12T00:37:28+5:302019-10-12T00:37:39+5:30
शहरात मनपा आयुक्त रमेश पवार यांनी प्लास्टिक बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी सुरु केली असून या अंतर्गत गुरुवारी शहरातील विविध दुकानांना भेटी देऊन त्या दुकानांमध्ये ‘गुडबाय प्लास्टिक’चे स्टिकर्स चिटकविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरात मनपा आयुक्त रमेश पवार यांनी प्लास्टिक बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी सुरु केली असून या अंतर्गत गुरुवारी शहरातील विविध दुकानांना भेटी देऊन त्या दुकानांमध्ये ‘गुडबाय प्लास्टिक’चे स्टिकर्स चिटकविण्यात आले.
प्लास्टिक मुक्त शहर ही संकल्पना राबविण्यास मनपा आयुक्त रमेश पवार यांनी सुरुवात केली आहे. या अंतर्गत गुरुवारी त्यांनी शिवाजी चौक ते कच्छी बाजार, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड, सुभाष चौक, गांधी पार्क या परिसरात सर्व विभागप्रमुखांसह प्लास्टिक जनजागृती मोहीम राबविली. यावेळी त्यांनी विविध व्यापारी प्रतिष्ठांना भेटी देऊन प्लास्टिकला गुडबाय करा, अशा सूचना दिल्या, तसे पत्रक ही व्यापाऱ्यांना देण्यात आले. यावेळी सहाय्यक नगररचनाकार जायभाये, किरण फुटाणे, उपायुक्त गणपत जाधव, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, रईस खान, नगरसचिव विकास रत्नपारखी, वसीम पठाण, श्रीकांत कुºहा, शेख शादाब, शेख हर्षद, किशन देशमुख, शिवाजी सरनाईक, अलकेश देशमुख, मंजूर अहेमद, भगवान यादव, विनय ठाकूर, मिर्झा बेग आदींची उपस्थिती होती.
यावेळी व्यापाºयांनीही प्रतिसाद देत ग्राहकांना कापडी पिशव्या दिल्या. या संदर्भात बोलताना आयुक्त पवार म्हणाले की, शहरातील भाजी विक्रेते, फळ विक्रेते, अन्य व्यावसायिक आदींमध्येही प्लास्टिकबाबत जनजागृती केली जाणार असून व्यापाºयांनी प्लास्टिक बंदीसाठी मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.