परभणी : शक्तीप्रदर्शनाने दिग्गजांचे उमेदवारी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 12:55 AM2019-10-05T00:55:56+5:302019-10-05T00:56:18+5:30
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघात शुक्रवारी अखेरच्या दिवशी ५० उमेदवारांनी ७६ अर्ज दाखल केले असून, जिंतूरमध्ये आ़ विजय भांबळे यांनी तर गंगाखेडमध्ये विशाल कदम यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी दाखल केली़ याशिवाय अन्यही दिग्गज नेत्यांनी ताकद पणाला लावत उमेदवारी अर्ज भरले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघात शुक्रवारी अखेरच्या दिवशी ५० उमेदवारांनी ७६ अर्ज दाखल केले असून, जिंतूरमध्ये आ़ विजय भांबळे यांनी तर गंगाखेडमध्ये विशाल कदम यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी दाखल केली़ याशिवाय अन्यही दिग्गज नेत्यांनी ताकद पणाला लावत उमेदवारी अर्ज भरले़
परभणी विधानसभा मतदार संघात शिवसेनेकडून आ़ डॉ़ राहुल पाटील, काँग्रेसकडून रविराज देशमुख यांनी तर सुरेश नागरे यांनी अपक्ष (काँग्रेसकडूनही, पण एबी फॉर्म सोबत नाही), बहुजन महा पार्टीकडून शेख सलीम शेख इब्राहीम, प्रहार जनशक्ती पार्टीकडून शिवलिंग बोधणे, मनसेकडून सचिन पाटील, शिवसेनेकडून डॉ़ संप्रिया राहुल पाटील, मराठवाडा मुक्ती मोर्चाकडून शमीम खान नसीर खान, बहुजन समाज पार्टीकडून प्रतिभा प्रमोद मेश्राम, आंबेडकर नॅशनल पार्टीकडून सुभाष अंभोरे यांच्यासह अनेक अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले़
पाथरी विधानसभा मतदार संघात अखेरच्या दिवशी १२ उमेदवारांनी १५ अर्ज दाखल केले़ त्यामध्ये काँग्रेसचे सुरेश वरपूडकर यांनी शक्ती प्रदर्शन करीत अर्ज दाखल केला़ याशिवाय या मतदार संघातून एमआयएमकडून मुजीब आलम बद्रे आलम यांनी तर आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अजय सोळंके, वंचित बहुजन आघाडीकडून विलास बाबर, बहुजन समाज पार्टीकडून गौतम उजगरे, बहुजन मुक्ती पार्टीकडून मोईज अन्सारी अब्दुल खादर यांनी अर्ज दाखल केले़ या शिवाय या मतदारसंघात ५ अपक्ष उमेवारांनीही अर्ज दाखल केले आहेत़
जिंतूर विधानसभा मतदार संघातून शुक्रवारी अखेरच्या दिवशी ९ उमेदवारांचे १४ अर्ज दाखल झाले़ त्यामध्ये मेघना बोर्डीकर यांनी भारतीय जनता पार्टीकडून व अपक्ष म्हणूनही तर आ़ विजय भांबळे यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसकडून अर्ज दाखल केला़ या शिवाय शिवसेनेचे राम पाटील यांनी अपक्ष तर समाजवादी पार्टीतर्फे स़ दिलावर स़ जमाल साहब यांनी तर आंबेडकर नॅशनल पार्टीच्या वतीने महेंद्र काळे, बहुजन समाज पार्टीच्या वतीने राजेंद्र घनसावंत, वंचित बहुजन आघाडीकडून मनोहर वाकळे यांनी अर्ज दाखल केले़ याशिवाय इतर अनेक अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केले. गंगााखेड विधानसभा मतदार संघातून १३ उमेदवारांनी २४ अर्ज दाखल केले़ त्यामध्ये शिवसेना-भाजपा महायुतीकडून विशाल कदम यांनी तर रत्नाकर गुट्टे यांचाही उमेदवारी अर्ज दाखल झाला़ शेतकरी फसवणूक प्रकरणात गुट्टे हे सध्या परभणीच्या कारागृहात आहेत़ उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी आणण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते कारागृहात गेले़ तेथे त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून गुट्टे यांची उमेदवारी अर्जावर स्वाक्षरी आणली़ त्यानंतर त्यांचे जावई तथा रासपच्या युवकचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांनी कार्यकर्त्यांसह उमेदवारी दाखल केली़ याशिवाय मनसेकडून विठ्ठल जवादे, वंचितकडून करुणा कुंडगीर, बहुजन विकास आघाडीकडून गजानन गिरी, बसपाकडून देवराव खंदारे, चंद्रशेखर साळवे आदींसह अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले़
पाटील, देशमुख, नागरे
आले समोरासमोर
४परभणी तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अनुषंगाने दुपारी १२़४५ च्या सुमारास तिन्ही प्रमुख उमेदवार समोरासमोर आले़ शिवसेनेचे आ़ डॉ़ राहुल पाटील हे समर्थकांसह अर्ज दाखल करण्यासाठी तहसीलमध्ये दाखल झाले़
४यावेळी त्यांच्यासोबत माजी आ़ विजय गव्हाणे, भाजपा शहराध्यक्ष आनंद भरोसे, डॉ़ विवेक नावंदर आदींची उपस्थिती होती़ याचवेळी काँग्रेसचे रविराज देशमुख हेही भगवानराव वाघमारे, उपमहापौर माजू लाला, जयश्री खोबे यांच्यासह दाखल झाले आणि अपक्ष उमेदवार सुरेश नागरे हे राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष स्वराजसिंह परिहार यांच्यासह तहसीलमध्ये दाखल झाले़
४या उमेदवारांनी एकमेकांशी संवाद साधला नाही; परंतु, दुरूनच एकमेकांना नमस्कार केला़ याचवेळी मनसेचे उमेदवार सचिन पाटीलही अर्ज दाखल करण्यासाठी तहसीलमध्ये आले़