परभणी : जिंतूर येथील शासकीय गोदामपाल निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 12:38 AM2018-12-08T00:38:09+5:302018-12-08T00:39:09+5:30

जिंतूर येथील पुरवठा विभागाच्या गोदामातील धान्यात तफावत आल्याची बाब तपासणीत समोर आल्याने गोदामपाल संदीप तमशेटे यांना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी निलंबित केले आहे. या संदर्भातील आदेश ६ डिसेंबर रोजी काढण्यात आला.

Parbhani: Government godown in Jitoor suspended | परभणी : जिंतूर येथील शासकीय गोदामपाल निलंबित

परभणी : जिंतूर येथील शासकीय गोदामपाल निलंबित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिंतूर येथील पुरवठा विभागाच्या गोदामातील धान्यात तफावत आल्याची बाब तपासणीत समोर आल्याने गोदामपाल संदीप तमशेटे यांना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी निलंबित केले आहे. या संदर्भातील आदेश ६ डिसेंबर रोजी काढण्यात आला.
जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील पथकाने २७ नोव्हेंबर रोजी जिंतूर येथील पुरवठा विभागाच्या धान्य गोदामाची अचानक तपासणी केली होती. त्यावेळी ७३ क्विंटल गहू, १२ क्विंटल तांदूळ कमी आढळून आला होता. याला गोदामपाल तमशेटे हेच जबाबदार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्याकडे सादर केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी गोदामपाल संदीप तमशेटे यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या संदर्भात ६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांच्या स्वाक्षरीने तमशेटे यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले. निलंबन कालावधीत त्यांना जिंतूर तहसील कार्यालय हे मुख्यालय देण्यात आले आहे.
पूर्वीही आढळली होती धान्यामध्ये तफावत
४जिंतूर येथील पुरवठा विभागाच्या गोदामातील धान्यामध्ये यापूर्वीही तपासणीत तफावत आढळली होती. त्यानुसार तफावतीची ६४ हजार ६१२ रुपयांची रक्कम गोदामपाल संदीप तमशेटे यांच्याकडून वसूल करण्याचे आदेश देण्यात आले होते. २६ जून रोजी या संदर्भातील आदेश काढण्यात आले होते; परंतु, सदरील तफावतीची रक्कम जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी वसूल केली नाही. ही बाबही तमशेटे यांच्या निलंबनाच्या अनुषंगाने समोर आली आहे. त्यामुळे पुरवठा विभागाच्या गोदामातील गैरप्रकार अधिकाºयांकडून कसा दाबून ठेवला जातो, हेही या माध्यमातून समोर आले आहे.

Web Title: Parbhani: Government godown in Jitoor suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.