परभणी : शासकीय दुध डेअरीतील संकलन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:34 AM2019-11-12T00:34:51+5:302019-11-12T00:35:00+5:30

आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील दूध उत्पादकांनाही बसला असून, येथील शासकीय दूध डेअरीमध्ये होणारे दुधाचे संकलन प्रतिदिन सुमारे ५ हजार लिटरने घटले आहे़ त्यामुळे शेतीबरोबरच या जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाही अडचणीत आला आहे़

Parbhani: Government milk collections decline | परभणी : शासकीय दुध डेअरीतील संकलन घटले

परभणी : शासकीय दुध डेअरीतील संकलन घटले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका जिल्ह्यातील दूध उत्पादकांनाही बसला असून, येथील शासकीय दूध डेअरीमध्ये होणारे दुधाचे संकलन प्रतिदिन सुमारे ५ हजार लिटरने घटले आहे़ त्यामुळे शेतीबरोबरच या जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाही अडचणीत आला आहे़
जिल्ह्यात खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वपूर्ण हंगाम मानला जातो़ या हंगामात कापूस आणि सोयाबीन ही नगदी पिके घेवून शेतकरी आपल्या उत्पादनात भर घालतात़ मागील काही वर्षांपासून शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय वाढीस लागला आहे़ इतर जिल्ह्याच्या तुलनेत परभणी जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय मर्यादित स्वरुपाचा असला तरी अनेक शेतकरी या व्यवसायाकडे वळले असून, दूध उत्पादनातून आर्थिक स्त्रोत वाढविले जात आहेत़ यावर्षी उन्हाळ्यामध्ये चाºयाचा प्रश्न निर्माण झाला होता़ त्याचा परिणाम या व्यवसायावर झाला़ दुधाचे उत्पादन कमी झाल्याने उत्पादकांना अडचणींचा सामना करावा लागला़ जून महिन्यापासून जिल्ह्यात पावसाळ्याला प्रारंभ झाल्यानंतर ओला चारा वाढेल, अशी अपेक्षा होती़ मात्र सुरुवातीच्या काळात पाऊस झाला नाही़ त्यामुळे ओला चाराही निर्माण झाला नाही़ त्यानंतर आॅक्टोबर महिन्यामध्ये जिल्हाभरात अतिवृष्टीने थैमान घातले़ या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस या दोन्ही उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्याच जोडीला दुग्ध व्यवसायालाही फटका बसला आहे़ संपूर्ण महिन्यात सातत्याने ओल राहिल्यामुळे पुरेसा चारा जनावरांना मिळाला नाही़ त्यामुळे दुधाचे उत्पन्न घटले आहे़ परभणी येथील शासकीय दूध डेअरीमध्ये दररोज दूध संकलन केले जाते़ ५० हजार लिटर क्षमतेची ही दुध डेअरी असून, या दुध डेअरीतही सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत आॅक्टोबर महिन्यात दुधाचे संकलन घटले आहे़ येथील दुध डेअरीत दररोज सर्वसाधारणपणे २५ हजार लिटर दुधाचे संकलन होते़ संकलित केलेल्या या दुधावर प्रक्रिया करून हे दूध पुणे, मुंबई येथील दुध डेअरींना पुरवठा केले जाते़ सप्टेंबर महिन्यात सरासरी २५ हजार ७२ लिटर दुधाचे संकलन झाले असून, आॅक्टोबर महिन्यामध्ये हे संकलन २० हजार ६७४ लिटरवर येऊन ठेपले आहे़ सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत आॅक्टोबर महिन्यात तब्बल ५ हजार लिटर दूध संकलनात घट झाली़ विशेष म्हणजे नोव्हेंबर महिन्यातही दूध संकलनात वाढ झाली नसल्याचे दिसत आहे़ या महिन्यात प्रतिदिन सरासरी १८ हजार लिटरपर्यंतच दुधाचे संकलन होत असून, सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत प्रतिदिन तब्बल ७ हजार लिटर दुधाची घट झाल्याची माहिती दूध डेअरीतून मिळाली़ आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टीचा फटका दूध उत्पादकांना बसला आहे़ दुध संकलनात मोठी घट झाल्याने दूध उत्पादकही अडचणीत सापडले आहेत़ त्यामुळे या व्यवसायाला उभारी देण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी दुध उत्पादकांतून होत आहे़
दूध उत्पादकांचे थकले पैसे
शासकीय दूध डेअरीमध्ये दूध विक्री केल्यानंतर दूध उत्पादक संस्थांना १० दिवसांतून एक वेळा पेमेंट दिले जाते़ मात्र २० सप्टेंबरपासून दूध उत्पादकांचे पेमेंट थकले आहे़ राज्यस्तरावरून नियमित पेमेंट दिले जात नसल्याने दूध उत्पादकांसमोर नव्या अडचणी उभ्या टाकल्या आहेत़ दरम्यान येथील जिल्हा दुध डेअरी प्रशासनाने औरंगाबाद येथील प्रादेशिक दुध व्यवसाय अधिकाऱ्यांकडे दूध उत्पादकांच्या ३१ डिसेंबरपर्यंतच्या पेमेंटपोटी ९० लाख ६४६ रुपयांची मागणी केली असून, अद्यापपर्यंत निधी उपलब्ध झाला नाही़ त्यामुळे ५० दिवसांपासून दुध उत्पादक हक्काच्या पैशांसाठी प्रतीक्षेत आहेत़ अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि त्यात दूध संकलनाचे पैसेही थकल्याने उत्पादकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत़
दुध संकलन केंद्रातून घटले संकलन
४परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात ४ दूध संकलन केंद्र आहेत़ सप्टेंबर महिन्यामध्ये परभणी येथील दूध संकलन केंद्रातून ९ हजार ७५३ लिटर तर आॅक्टोबर महिन्यात ८ हजार २७६ लिटर दुधाचे संकलन करण्यात आले़
४पाथरीत सप्टेंंबर महिन्यात ८ हजार ७४४ तर आॅक्टोबर महिन्यात ६ हजार ५५ लिटर दुध संकलित झाले़ हिंगोली येथून सप्टेंबर महिन्यात १ हजार ९८२ तर आॅक्टोबर महिन्यात १ हजार ३९५ लिटर दुधाचे संकलन करण्यात आले़
४गंगाखेड केंद्रावरूनही दुधाच्या संकलनात घट झाली असून, सप्टेंबर महिन्यात या केंद्रातून ४ हजार ५९३ लिटर प्रतिदिन दूध संकलित झाले होते़ आॅक्टोबर महिन्यात ४ हजार ४२ लिटर दुध संकलित झाले आहे़

Web Title: Parbhani: Government milk collections decline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.