परभणी : शासकीय विश्रामगृह पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 12:45 AM2019-03-05T00:45:46+5:302019-03-05T00:46:04+5:30

शहरातील शनिवार बाजार परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाची दुरवस्था झाली असून दोन वर्षांपासून हे विश्रामगृह बंद असल्याने सध्या ते ओस पडले आहे.

Parbhani: Government rest houses fall ocean | परभणी : शासकीय विश्रामगृह पडले ओस

परभणी : शासकीय विश्रामगृह पडले ओस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील शनिवार बाजार परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाची दुरवस्था झाली असून दोन वर्षांपासून हे विश्रामगृह बंद असल्याने सध्या ते ओस पडले आहे.
परभणी शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित शनिवार बाजार येथील निजामकालीन विश्रामगृह तसेच वसमतरोडवरील नव्याने बांधकाम झालेले सावली विश्रामगृह अशा दोन विश्रामगृहांचा समावेश आहे. त्यापैकी शनिवार बाजारातील विश्रामगृहाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. दोन वर्षांपासून या विश्रामगृहाचा वापरही बंद करण्यात आला आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येणारे अधिकारी, पदाधिकारी आणि इतर पाहुणे मंडळींना सावली विश्रामगृहामध्येच निवारा द्यावा लागत आहे. परभणी शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते.
प्रत्येक महिन्यात अनेक कार्यक्रम या ठिकाणी होतात. त्यामुळे पुणे, मुंबईसह इतर जिल्ह्यांमधून परभणीत कार्यक्रमाच्या निमित्ताने येणाऱ्या पाहुण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शनिवार बाजारातील विश्रामगृह बंद पडल्याने अनेक वेळा बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची खाजगी हॉटेलमध्ये व्यवस्था करावी लागते.
शनिवार बाजार भागातील शासकीय विश्रामगृहाचे बांधकाम निजामकालीन आहे. शहरामध्ये सावली विश्रामगृहाची उभारणी झाल्यानंतर जुन्या विश्रामगृहाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. परिणामी या विश्रामगृहाच्या दुरवस्थेत दिवसेंदिवस भर पडली. सध्या या विश्रामगृहाची इमारत मोडकळीस आली आहे.
समोरील बाजुने आरसीसी बांधकाम असले तरी पाठीमागील बाजू जुन्या बांधकामाची आहे. विश्रामगृहातील खोल्यांचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. प्रकाश व्यवस्थेची वायरिंग जागोजागी उखडली असून फर्निचरची मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे. त्यामुळे दोन वर्षापासून या विश्रामगृहाचा वापर बंद करण्यात आला आहे. एैसपैस जागा आणि सुविधा असतानाही शहराच्या मध्यवस्तीत असलेले हे विश्रामगृह ओस पडले आहे.
बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन विश्रामगृहाची दुरुस्ती करुन ते वापरण्यायोग्य करावे, अशी मागणी होत आहे.
दुसºया फळीतील कार्यकर्त्यांची गोची
४सावली विश्रामगृहामध्ये अति महत्त्वांच्या व्यक्तींसाठी निवासाची व्यवस्था केली जाते. याशिवाय या ठिकाणी सर्वसाधारण कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसाठी चार कक्ष उपलब्ध आहेत. मात्र ते अपुरे पडतात. अनेक वेळा बाहेरगावाहून येणाºया अति महत्त्वाच्या व्यक्तींसोबत येणाºया इतर व्यक्तींची निवासाची व्यवस्था होत नाही. अशा दुसºया फळीतील पाहुण्यांसाठी शनिवार बाजारातील विश्रामगृह सोयीचे ठरत होते. मात्र या विश्रामगृहाचीच दुरवस्था झाल्याने गैरसोयीत भर पडली आहे.
इमारत पाडण्याची मागितली परवानगी
शनिवार बाजारातील सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरातील शासकीय विश्रामगृहाची इमारत जुनी झाल्याने ती पाडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी साबां उपविभागाने केली आहे. या मागणीच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकर्त्यांनी उपविभागीय अभियंत्यांना २१ सप्टेंबर २०१६ रोजी पत्र पाठवून निजामकालीन असलेल्या या इमारतीचा वापर बंद ठेवावा, असे सूचित केले आहे. तेव्हापासून हे विश्रामगृह बंद अवस्थेत आहे.
निवास खोल्या कुलूपबंद अवस्थेत
शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात काही निवासी खोल्याही उपलब्ध आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून या खोल्यांचा वापर बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शनिवार बाजारातील शासकीय विश्रामगृह केवळ नावापुरतेच शिल्लक राहिले असून कधीकाळी अति महत्त्वाच्या व्यक्तींचे निवासस्थान असलेली ही वास्तू सध्या मात्र भनान अवस्थेत उभी आहे.
गार्डनचीही दुरवस्था
४येथील शासकीय विश्रामगृह परिसरामध्ये काही वर्षांपूर्वी गार्डन विकसित केले होते. झाडे लावून विश्रामगृह परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले. सध्या मात्र या गार्डनची दुरवस्था झाली आहे. परिसरातील लॉन पूर्णत: वाळून गेली असून काही झाडेही वाळली आहेत. गार्डनच्या सुशोभिकरणाकडेच बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. किमान या भागातील गार्डनची निगा राखली असती तर हा परिसर आणखी आकर्षक दिसला असता. तेव्हा किमान गार्डनचे सुशोभिकरण करावे, अशी मागणी होत आहे.

Web Title: Parbhani: Government rest houses fall ocean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :parabhaniपरभणी