परभणी : तीन हजार विद्यार्थ्यांना पदवीदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:27 AM2018-12-27T00:27:57+5:302018-12-27T00:28:09+5:30
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये बुधवारी पार पडलेल्या दीक्षांत समारंभात विविध विद्या शाखांमधील ३ हजार ३७६ स्रातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवीने कुलगुरु व मान्यवरांच्या हस्ते अनुग्रहित करण्यात आले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये बुधवारी पार पडलेल्या दीक्षांत समारंभात विविध विद्या शाखांमधील ३ हजार ३७६ स्रातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवीने कुलगुरु व मान्यवरांच्या हस्ते अनुग्रहित करण्यात आले़
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमास भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ़ त्रिलोचन महापात्र, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खा़ संजय धोत्रे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, कुलगुरु डॉ़ अशोक ढवण यांच्यासह विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आ़डॉ़राहुल पाटील, लिंबाजी भोसले, अजय गव्हाणे, बालाजी देसाई, शरद हिवाळे, डॉ़ आदिती सारडा, कुलसचिव रणजीत पाटील, शिक्षण संचालक डॉ़ विलास पाटील, माजी कुलगुुरू डॉ़ एस़एस़ कदम, डॉ़ बी़ व्यंकटेस्वरलू, डॉ व्हीक़े़ पाटील, डॉ़ के़ पी़ गोरे, संशोधन संचालक डॉ़दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ़ प्रदीप इंगोले, कुलसचिव डॉ़ गजानन भालेराव आदींची उपस्थिती होती़
या सोहळ्यात आचार्य पदवीचे ६१, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे ३६४ आणि पदवी अभ्यासक्रमाच्या २ हजार ९५१ स्रातकांना पदवी प्रदान करण्यात आली़
त्याचप्रमाणे विद्यापीठाने घोषित केलेल्या सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला़
२०१६६-१७ वर्षामधील गोविंद रॉय शर्मा (कृषी), जे़ आरथी (उद्यान विद्या), बलराम यादव (कृषी जैव तंत्रज्ञान), प्रियंका स्वामी (गृह विज्ञान), इंद्रजीत सिंह (कृषी अभियांत्रिकी), पदमप्रिया निराली (अन्नतंत्रज्ञान), मनोहर धोंडकर (कृषी व्यवसाय व्यवस्थापन), पदव्युत्तर अभ्यासक्रमातील श्रीवर्षा जस्ती (कृषी), सुप्रिया सिंघम (उद्यान विद्या), टी़ अरुणा (गृह विज्ञान), श्वेता सोळंके (कृषी अभियांत्रिकी), दिव्यानी शिंदे (अन्नतंत्रज्ञान), आरती देशमुख (कृषी जैन तंत्रज्ञान), एल़ बांधवी (कृषी व्यवसाय व्यवस्थापन) २०१५-१६ या शैक्षणिक वर्षामध्ये के़ अविनाश (कृषी), एस़ सजना (उद्यान विद्या), सत्यवान भोसले (कृषी जैन तंत्रज्ञान), रेशमा मल्लेशी (गृह विज्ञान), पुरणप्रज्ञा जोशी (कृषी अभियांत्रिकी), मुकेश बेलवाल (अन्नतंत्रज्ञान), एक़े़ शिवशंकर (कृषी व्यवसाय व्यवस्थापन) या विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले़