परभणी : हरभरा उत्पादकांसाठी मिळाले साडेआठ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:49 AM2018-08-13T00:49:36+5:302018-08-13T00:57:30+5:30

जिल्ह्यातील ७ हमीभाव खरेदी केंद्राकडे हरभरा उत्पादकांनी विक्री केलेल्या शेतमालाची रक्कम अदा करण्यासाठी ८ कोटी ५९ लाख ५० हजार ४१२ रुपये प्राप्त झाले असून १४०६ शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळणार आहे.

Parbhani: Gram growers get Rs. 8 crores for the producers | परभणी : हरभरा उत्पादकांसाठी मिळाले साडेआठ कोटी

परभणी : हरभरा उत्पादकांसाठी मिळाले साडेआठ कोटी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील ७ हमीभाव खरेदी केंद्राकडे हरभरा उत्पादकांनी विक्री केलेल्या शेतमालाची रक्कम अदा करण्यासाठी ८ कोटी ५९ लाख ५० हजार ४१२ रुपये प्राप्त झाले असून १४०६ शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळणार आहे.
जिल्ह्यात नाफेडने जिंतूर तालुक्यातील बोरी, गंगाखेड, जिंतूर, परभणी, सेलू, पाथरी व पूर्णा येथे हमीभाव केंद्र सुरू केले होते. या केंद्रांवर १५ एप्रिलपासून ४ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव दराने शेतमाल खरेदी करण्यात आला. राज्य शासनाने हमीभाव खरेदी केंद्राला दिलेल्या मुदतीत जिल्ह्यातील ७ केंद्रावर २ हजार ७३० शेतकºयांनी ३८ हजार १०४ क्विंटल हरभºयाची विक्री केली होती. हमीभाव खरेदी केंद्राकडे ज्या शेतकºयांनी आपला शेतमाल विक्री केला आहे, त्या शेतकºयांना एका महिन्याच्या आत त्यांचा मोबदला मिळणे अपेक्षित होते; परंतु, राज्य शासन व नाफेडच्या उदासीन भूमिकेमुळे जिल्ह्यातील हरभरा उत्पादकांना आपला शेतमाल विकून मोबदल्यासाठी ३ महिने वाट पहावी लागली.
आठ दिवसांपूर्वी नाफेडकडून जिल्ह्याला ८ कोटी ५९ लाख ५० हजार ४१२ रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे. या रक्कमेतून १४०६ शेतकºयांना मोबदला दिला जाणार आहे. विशेष म्हणजे, २ हजार ७३० शेतकºयांनी आपला शेतमाल हमीभाव खरेदी केंद्राकडे विक्री केला आहे. त्यामुळे या सर्व शेतकºयांना त्यांच्या शेतमालाचा मोबदला मिळणे अपेक्षित आहे; परंतु, नाफेडकडून तुटपुंजी रक्कम जिल्ह्याला वर्ग केल्याने अजूनही १ हजार ३२४ शेतकºयांना शेतमाल विकूनही मोबदल्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हरभरा उत्पादकांनी विक्री केलेल्या शेतमालाचा मोबदला देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.
१३२४ हरभरा उत्पादकांना प्रतीक्षाच
शेतमालाच्या मोबदल्यासाठी मिळालेल्या साडेआठ कोटी रुपयांतून केवळ १४०६ शेतकºयांनाच मोबदला वाटप होणार आहे. त्यामुळे १ हजार ३२४ शेतकºयांना शेतमाल विक्री करुनही मोबदल्यासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
अशी मिळाली रक्कम
नाफेडकडून जिल्ह्याला हरभरा उत्पादकांचा मोबदला अदा करण्यासाठी साडेआठ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. यामधून बोरी येथील हमीभाव खरेदी केंद्रावर शेतमाल विक्री केलेल्या शेतकºयांपैकी १८६ शेतकºयांना १ कोटी ३५ लाख ५४ हजार २०० रुपये वाटप केले जाणार आहेत. गंगाखेड केंद्रावरील १८९ शेतकºयांना १ कोटी २८ लाख ४३ हजार ५९१, जिंतूर केंद्रावरील १५८ शेतकºयांना ९४ लाख ४० हजार २८०, परभणी येथील केंद्रावरील २३५ शेतकºयांना १ कोटी ५२ लाख ७० हजार २००, सेलू केंद्रावरील १५५ शेतकºयांना १ कोटी १० लाख ४१ हजार ८००, पूर्णा केंद्रावरील एका शेतकºयाला ६६ हजार तर पाथरी केंद्रावरील सर्वाधिक ४४२ शेतकºयांना २ कोटी ३७ लाख ३४ हजार ४२० रुपयांचे वाटप केले जाणार आहे.
तूर उत्पादकांना ४३ कोटी ५५ लाखांचे वाटप
जिंतूर तालुक्यातील बोरी, गंगाखेड, जिंतूर, परभणी, सेलू, पाथरी व पूर्णा या सात ठिकाणी नाफेडकडून एप्रिल महिन्यात ७ हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते. या केंद्राकडे ४ हजार ६९८ शेतकºयांनी तुरीची विक्री केली होती. या शेतमालापोटी नाफेडकडून टप्प्याटप्प्याने तूर उत्पादकांना ४३ कोटी ५५ लाख ६१ हजार २७५ रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

Web Title: Parbhani: Gram growers get Rs. 8 crores for the producers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.