परभणी :ग्रामसेवक तरुणीची छेड काढणाऱ्या युवकास दिला चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:33 AM2018-03-20T00:33:26+5:302018-03-20T00:33:26+5:30
ग्रामसेविकेला सतत त्रास देणाºया एका युवकाला इतर ग्रामसेविकांनी चोप दिल्याची घटना १९ मार्च रोजी दुपारी गंगाखेड शहरात घडली़ त्यानंतर या युवकास पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : ग्रामसेविकेला सतत त्रास देणाºया एका युवकाला इतर ग्रामसेविकांनी चोप दिल्याची घटना १९ मार्च रोजी दुपारी गंगाखेड शहरात घडली़ त्यानंतर या युवकास पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आले आहे़
गंगाखेड पंचायत समिती कार्यालयातील एका २४ वर्षीय ग्रामसेविकेची छेड काढण्याचा प्रकार मागील काही दिवसांपासून होत होता़ तालुक्यातील पांढरगाव येथील प्रेमचंद बडे हा विवाहित तरुण साधारणत: ९ महिन्यांपासून या ग्रामसेविकेची छेड काढीत होता़ अनेक वेळा समज दिल्यानंतरही त्याने ग्रामसेविकेचा पिच्छा सोडला नाही़ १९ मार्च रोजी ही ग्रामसेवक तरुणी आपल्या इतर सहकारी ग्रामसेविकेसमवेत पंचायत समिती कार्यालयात कामकाज करीत असताना प्रेमचंद बडे त्या ठिकाणी आला़ त्याने संबंधित ग्रामसेविकेला बोलावून माझे तुझ्यावर पे्रम आहे़, असे म्हणाला़ त्यावर सतत होणाºया या त्रासामुळे वैतागलेल्या या ग्रामसेवक तरुणीने त्यास जाब विचारत त्याला चांगलेच खडसावले़ यामुळे सहकारी ग्रामसेविका महिलाही त्या ठिकाणी आल्या़ तेव्हा बडे याने तुम्ही तुमचे काम करा, आमच्यामध्ये पडू नका, असे या महिलांना सांगितले़
याचा राग अनावर झाल्याने ग्रामसेवक तरुणीने या युवकास चपलेचा प्रसाद दिला़ इतर ग्रामसेवक महिलांनीही आरडाओरड केल्यानंतर पंचायत समिती कार्यालयातील कर्मचाºयांनी रेकॉर्ड रुमकडे धाव घेतली व महिला कर्मचाºयाची छेड काढणाºया या युवकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले़
प्रतिबंधात्मक कार्यवाही
ग्रामसेविकेची छेड काढणाºया युवकास पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी व इतर पोलीस कर्मचाºयांनी या युवकाविरूद्ध प्रतिबंधात्मक कार्यवाही केली़ ग्रामसेविका महिलेच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली़ जमादार दीपक भारती, पोलीस शिपाई राहुल मोरे या प्रकरणाचा तपास करीत आहेत़