परभणी : शिवजयंतीनिमित्त अभिवादनास गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:29 AM2018-03-05T00:29:47+5:302018-03-05T00:30:03+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात रविवारी अभिवादनासाठी दिवसभर गर्दी झाली होती़ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अनेकांनी अभिवादन केले़

Parbhani: Greetings from the crowd for Shiv Jayanti | परभणी : शिवजयंतीनिमित्त अभिवादनास गर्दी

परभणी : शिवजयंतीनिमित्त अभिवादनास गर्दी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात रविवारी अभिवादनासाठी दिवसभर गर्दी झाली होती़ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अनेकांनी अभिवादन केले़
४ मार्च रोजी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली़ यानिमित्त शहरात विविध कार्यक्रम पार पडले़ शिवसेनेच्या वतीने राजाराम सभागृहात भजन स्पर्धा घेण्यात आली़ आ़डॉ़राहुल पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले़
यावेळी सहसंपर्कप्रमुख डॉ़विवेक नावंदर, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ़संजय टाकळकर, संदीप झाडे, गटनेते चंदू शिंदे, नगरसेवक प्रशास ठाकूर, दिनेश बोबडे, बाजार समितीचे संचालक सोपानराव आवचार, बालासाहेब घिके, नवनीत पाचपोर आदींची उपस्थिती होती़ यावेळी टाकळी कुंभकर्ण, झरी, पिंप्री देशमुख, तट्टू जवळा, पिंगळी येथील भजनी मंडळास आ़राहुल पाटील यांच्या वतीने मृदंग व टाळ जोडाचे वाटप करण्यात आले़ जिल्ह्यातील ४० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता़
मशाल फेरी
येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने रविवारी शिवप्रभू मशाल फेरी काढण्यात आली़ सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शहरातील शिवाजी चौक येथून या मशाल फेरीला प्रारंभ झाला़ सुमारे ४५० कार्यकर्ते या फेरीत सहभागी झाले होते़ छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयजयकार करीत ही मशाल फेरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली़

Web Title: Parbhani: Greetings from the crowd for Shiv Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.