परभणी: सार्वजनिक ठिकाणांवर रोडरोमिओंचा वाढता त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:13 AM2019-07-29T00:13:39+5:302019-07-29T00:13:46+5:30
एक महिन्यापासून शहरातील शाळा, महाविद्यालय सुरु झाली आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालय परिसर व ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे बसस्थानक परिसर गजबजलेला दिसून येत आहे. हीच संधी साधून काही रोडरोमिओ शाळा, महाविद्यालय, बसस्थानक परिसरात जाऊन टोळ्या जमवून टवाळक्या करताना दिसून येत आहेत. यावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): एक महिन्यापासून शहरातील शाळा, महाविद्यालय सुरु झाली आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालय परिसर व ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे बसस्थानक परिसर गजबजलेला दिसून येत आहे. हीच संधी साधून काही रोडरोमिओ शाळा, महाविद्यालय, बसस्थानक परिसरात जाऊन टोळ्या जमवून टवाळक्या करताना दिसून येत आहेत. यावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शाळा, महाविद्यालये सुरु झाल्यानंतर ग्रामीण भागासह पाथरी तालुक्यातील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी मानवत शहरात येतात. यामध्ये मुलींची संख्या जास्त आहे. शाळा, महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थिनी बसची वाट बघत बसस्थानक परिसरात थांबतात. हिच संधी साधत मुली ज्या ठिकाणी थांबलेल्या असतात, त्या ठिकाणी रोडरोमिओ चकरा मारणे, मोटारसायकलवरुन विनाकारण हॉर्न वाजवीत जाणे, मुलींना पाहून शेरेबाजी करणे, असे प्रकार सरार्सपणे करतात. यातील काहीजण शहरातून धुम स्टाईलने दुचाकी पळवून दुचाकीचे कर्कश हॉर्न वाजवित विविध अवाज काढतात. यामुळे अनेक छोटेमोठे आपघात घडल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकारामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही घटना अशाही आहेत की ज्यामध्ये पालकांकडून आपले शिक्षण थांबविले जाईल किंवा त्याचे मोठ्या भांडणामध्ये रुपांतर होईल, या भीतीने अनेक विद्यार्थिनी आपल्या सोबत घडत असलेले प्रकार पालकांना सांगत नाहीत.
यामुळे शाळा, महाविद्यालय, खाजगी शिकवणीवाले यांनी या बाबीची गंभीर दखल घेऊन आपल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची आवश्यकता आहे. जेणेकरुन रोडरोमियोंवर कारवाई करणे सोपे जाईल. दुसरीकडे पोलीस प्रशानानेही चिडीमार पथक स्थापन करुन रोडरोमिओंना चाप बसविण्याची मागणी पालकांतून होत आहे. दरम्यान, काही भागात मोटारसायकलवरवरुन विनाकारण हॉर्न वाजवून विद्यार्थिनींना त्रास देण्याचेही प्रकार घडत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याची व या रोडरोमिओवर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
रोडरोमिओंबाबत अनेक तक्रारीही प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन व दामिनी पथकाने लक्ष देऊन वेळीच कारवाई करण्याची गरज आहे.
वळण रस्त्यावर अल्पवयीन मुले सुसाट
४शहरातील वळण रस्त्यावर दोन महाविद्यालय, एक शाळा आणि खाजगी कोचिंग क्लासेस आहेत. महाराणा प्रताप चौक ते मल्लिकार्जुन मंदिरापर्यंत असलेल्या पुलाशेजारील रस्त्यावर विद्यार्थ्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. मुली याच रस्त्याने शाळा, महाविद्यालयात येत असतात.
४या रस्त्यावरुन अल्पवयीन मुले मोटारसायकल सुसाट पळवितानाचे चित्र आहे. पोलिसांनी या मुलांना ताब्यात घेउन पालकांशी संपर्क करुन समज देणे गरजेचे झाले आहे. टवाळखोर मुलांबाबत समोर येउन तक्रार करायला मुली घाबरतात. त्यामुळे शाळा, महाविद्यालय परिसरात तक्रारपेट्या बसविण्याची मागणी होत आहे.
या भागात सीसीटीव्ही कॅमेºयाची गरज
४मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने नगरपालिकेने पुढाकार घेऊन शहरातील मुलींची वर्दळ असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. यामध्ये शहरातील बसस्थानक, महाराणा प्रताप चौक, आठवडे बाजार रस्ता, गोलाईत नगर रस्ता, पोलीस क्वार्टर रस्ता, पाळोदी रस्ता, केंद्रीय प्राथमिक शाळा या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे असणे गरजेचे आहे.
४तसेच वळण रस्त्यावर असलेल्या शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावर प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास शाळा, महाविद्यालयाच्या बाहेरील टवाळखोरांवर लक्ष ठेवणे सोपे जाईल. खाजगी कोचिंग क्लासेस चालकांनीही आपल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे.