परभणी:वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:18 AM2019-06-25T00:18:01+5:302019-06-25T00:18:54+5:30

पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवेसह मसाज सुविधा पुरविण्याचा उपक्रम येथील संवगडी ग्रुपने ३ वर्षांपासून सुरू केला असून, या उपक्रमात शहरातील तज्ज्ञ डॉक्टर सहभाग नोंदवितात. या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून वारकºयांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे.

Parbhani: Healthcare for the Warakaris | परभणी:वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा

परभणी:वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवेसह मसाज सुविधा पुरविण्याचा उपक्रम येथील संवगडी ग्रुपने ३ वर्षांपासून सुरू केला असून, या उपक्रमात शहरातील तज्ज्ञ डॉक्टर सहभाग नोंदवितात. या अनोख्या उपक्रमाच्या माध्यमातून वारकºयांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे.
विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवकांनी ‘सवंगडी कट्टा’ हा समूह स्थापन केला आहे. या समूहाच्या माध्यमातून मागील ३ वर्षांपासून मोफत आरोग्यसेवा तसेच मसाज सेवा आणि वारकºयांना मोफत औषधी देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. यावर्षी २२ जूनपासून संत जनाबाई मंदिरात मुक्कामी येणाºया पायी दिंडीतील वारकºयांना विविध सेवा मोफत देण्याच्या कार्याला सुरुवात करण्यात आली. उत्तर महाराष्ट्रातील विदर्भातून पंढरपूरकडे पायी जाण्यासाठी निघालेल्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीबरोबरच अनेक छोट्या-मोठ्या पालख्या गंगाखेड येथील श्रीसंत जनाबाई यांचे दर्शन घेऊन पुढे रवाना होतात. या पालखीतील वारकरी श्रीसंत जनाबाई मंदिर आणि झोपडी येथे मुक्कामी थांबतात.
गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हेमंत मुंढे, डॉ. योगेश मल्लुरवार, डॉ.देविदास चव्हाण, डॉ.ऐश्वर्या परळीकर, डॉ.पारस जैन, डॉ.सचिन सुपेकर, डॉ.बालासाहेब मानकर, डॉ.मनिष बियाणी आदी तज्ज्ञ डॉक्टर मंडळी आरोग्य तपासणीसाठी वेळ देत आहेत. तसेच औषधी दुकान चालक व इतर दानशूर व्यक्तींंच्या सामूदायिक सहभागातून औषधी उपलब्ध करून दिली जात आहे.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश औसेकर, गोविंद यादव, प्रकाश घन, मनोज नाव्हेकर, प्रा.मुंजाजी चोरघडे, गजानन महाजन, कृष्णा तापडिया, अक्षय जैन, दिलीप सोळंके, कारभारी निरस, हरिभाऊ सावरे, गोपी मुंडे, सुहास पाठक, नागेश कोनार्डे, संतोष पाठक आदींसह अनेक सामाजिक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. सवंगडी ग्रुपच्या या उपक्रमाचे वारकरी सांप्रदायाकडून कौतूक केले जात आहे.
दाढी, कटिंग अन् पादत्राणांचीही दुरुस्ती
४दिंडीत सहभागी झालेल्या वारकºयांच्या मोफत आरोग्य तपासणीसह त्यांना औषधींचा पुरवठा करण्याचा उपक्रम सवंगडी ग्रुपने सुरू केला आहे. आरोग्य सेवा देण्याबरोबरच हात, पायांची मसाज करणे, मोबाईल चार्जिंग, पादत्राणे दुरूस्ती, दाढी-कटिंग आदी सुविधाही या ग्रुपच्या सदस्यांनी उपलब्ध करून देण्याचा मानस यावर्षीपासून केला आहे.
४मुक्कामाच्या ठिकाणी या सर्व सेवा मिळत असल्याने दिंडीत सहभागी वारकºयांची चांगलीच सोय होते. याबद्दल वारकºयांतूनही समाधान व्यक्त केले जात आहे.

Web Title: Parbhani: Healthcare for the Warakaris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.