परभणी, पाथरीतच पावसाचा जोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:20 AM2021-09-23T04:20:27+5:302021-09-23T04:20:27+5:30
यावर्षीच्या पावसाळ्यात दमदार पाऊस होत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्याने वार्षिक सरासरी ओलांडली असून अजूनही पाऊस सुरूच आहे. मंगळवारी रात्री ...
यावर्षीच्या पावसाळ्यात दमदार पाऊस होत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्याने वार्षिक सरासरी ओलांडली असून अजूनही पाऊस सुरूच आहे. मंगळवारी रात्री सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यात परभणी आणि पाथरी या दोन तालुक्यांमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. परभणी तालुक्यात २५.९ मिमी तर पाथरी तालुक्यात २०.९ मिमी पाऊस झाला. सध्या होत असलेला पाऊस खरीप हंगामातील पिकांसाठी तापदायक ठरत आहे. शेत जमिनीमध्ये पाण्याची ओल साचत असून त्यामुळे पिके पिवळी पडण्याची शक्यता आहे. शिवाय दोन दिवसांपासून सूर्यदर्शन झाले नसल्याने जमिनीतील ओलावा कायम आहे. त्यामुळे आता पाऊस थांबावा,अशी प्रार्थना शेतकरी करीत आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत झालेला पाऊस टक्केवारीत
परभणी : १२३
गंगाखेड : १३२
पाथरी : १६३
जिंतूर : १२८
पूर्णा : १२५
पालम : १४९
सेलू : १३४
सोनपेठ : १३९
मानवत : १३२