परभणी : आधार लिंक असलेल्या शेतकऱ्यांनाच मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:16 AM2019-11-27T00:16:12+5:302019-11-27T00:16:45+5:30
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आधार लिंक असलेल्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार असून, ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड आॅनलाईन लिंक झाले नाही, अशा लाभार्थ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत आधार लिंक करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत आधार लिंक असलेल्या लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार असून, ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड आॅनलाईन लिंक झाले नाही, अशा लाभार्थ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत आधार लिंक करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे़
केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना लागू केली आहे़ या योजनेंतर्गत पात्र असणाºया शेतकºयांना अनुदान दिले जाते़ जिल्ह्यात शेतकºयांच्या याद्या तयार करण्यात आल्या होत्या़ त्यानुसार १ आॅगस्ट २०१९ पासून केवळ आधार लिंक असलेल्या लाभार्थ्यांनाच लाभ दिला जाणार होता़
मात्र राज्यस्तरावर ५० लाख लाभार्थ्यांचा डाटा आधार लिंक नसल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती़ या पार्श्वभूमीवर शेतकºयांचा डाटा आधार लिंक करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे़
त्यानंतर मात्र मुदतवाढ दिली जाणार नाही़ १ डिसेंबर २०१९ नंतर पात्र लाभार्थ्यांना आधार लिंकच्या आधारेच अनुदान वितरित होणार आहे़ आधार लिंक करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रामार्फत लाभार्थ्यांनी दुुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे़
लिंकची सुविधा केली उपलब्ध
४पीएम किसान योजनेंतर्गत शेतकºयांचे आधार क्रमांक लिंक करण्यासाठी पीएम किसान पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे़ पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या नावासमोर आधार प्रमाणे दुरुस्ती करण्यासाठी फार्मस कॉर्नरमध्ये इडिट आधार फेल्युुअर रेकॉर्ड ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे़ त्यानुसार लाभार्थ्यांना या पोर्टलवर जाऊन स्वत: दुरुस्ती करता येईल किंवा आपले सरकार सेवा केंद्रामार्फतही दुरुस्ती करून दिली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले़