परभणी : शहीद जवानाच्या कुटुंबाला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:24 AM2018-04-18T00:24:21+5:302018-04-18T00:24:21+5:30
महावितरण कंपनीच्या नांदेड परिमंडळातील कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत वर्गणी जमा करुन १ लाख १८ हजार ४०० रुपयांची रोख मदत शहीद जवान शुभम मुस्तापुरे यांच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: महावितरण कंपनीच्या नांदेड परिमंडळातील कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत वर्गणी जमा करुन १ लाख १८ हजार ४०० रुपयांची रोख मदत शहीद जवान शुभम मुस्तापुरे यांच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केली.
पालम तालुक्यातील कोनेरवाडी येथील शुभम सूर्यकांत मुस्तापुरे हे जम्मू काश्मीरमध्ये कृष्णा घाटीत कर्तव्यावर असताना ३ एप्रिल रोजी पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शहीद झाले होते. केवळ २० वर्षे वय असलेल्या व देशासाठी बलिदान दिलेल्या शुभम मुस्तापुरे या जवानाच्या कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त करीत महावितरण कंपनीच्या नांदेड परिमंडळाअंतर्गत येणाºया नांदेड, परभणी व हिंगोली मंडळातील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी शहीद जवान मुस्तापुरे यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचा संकल्प केला. अवघ्या तीन दिवसात एक लाख १८ हजार ४०० रुपयांचा निधी जमा केला.
नांदेड मंडळातील कर्मचाºयांनी ४६ हजार ७००, हिंगोली मंडळाने ३० हजार २०० तर परभणी मंडळातील कर्मचाºयांनी ४१ हजार ५०० रुपयांचा निधी जमा करुन मुस्तापुरे कुटुंबियांकडे सुपूर्द केला. या उपक्रमासाठी परभणी मंडळाचे सचिन कवडे, हरिशंकर वाभळे, विकास मिश्रा, शिवशंकर चाकोते, नांदेड मंडळातील नागेश मरकुंदे, देविदास लांडगे, शिवराज सोनटक्के, संतोष स्वामी, विठ्ठल पोहरे, गजानन इबितवार, चंद्रकांत गडप्पा, हिंगोली मंडळातील संतोष होंडे, संतोष भांदरवाड यांनी प्रयत्न केले.