परभणी:कापसाला ६ हजार १४० रुपयांचा उच्चांकी भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 11:46 PM2019-04-01T23:46:35+5:302019-04-01T23:47:02+5:30
यंदाच्या कापूस हंगामातील सर्वात उच्चांकी ६ हजार १४० रुपयांचा भाव १ एप्रिल रोजी कापसाला मिळाला. यामुळे कापूस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. बाजार समितीच्या यार्डात कापसाची आवक सुरु असून, शेकडो वाहने घेऊन शेतकरी लिलावात येत असल्याचे चित्र बाजार समितीत दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी) : यंदाच्या कापूस हंगामातील सर्वात उच्चांकी ६ हजार १४० रुपयांचा भाव १ एप्रिल रोजी कापसाला मिळाला. यामुळे कापूस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. बाजार समितीच्या यार्डात कापसाची आवक सुरु असून, शेकडो वाहने घेऊन शेतकरी लिलावात येत असल्याचे चित्र बाजार समितीत दिसत आहे.
यंदा कापूस जगविण्यासाठी अधिक झळ शेतकऱ्यांना बसली आहे. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस वेचणीसाठी ८ ते १० ते दहा रुपये किलो प्रमाणे पैसे माजावे लागले होते. मात्र कापुस हंगाम २०१८ - १९ अंतर्गत आक्टोबर महिन्यात बाजार समितीच्या यार्डात लिलाव सुरु झाल्यानंतर लिलावात प्रत्यक्ष कापसाला हमीभावा पेक्षा जास्त भाव मिळाला. मधल्या काळात ५ हजार ४८० रुपयापर्यंत कापसाचे भाव खाली आले होते़ मात्र मागील आठवडा भरापासुन कापसाच्या भावात सतत वाढ होत असल्याने शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. १ एप्रिल रोजी कापसाला ६ हजार १४० रुपयांचा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून आले़ परभणी, सोनपेठ, पाथरी तालुक्यासह मानवत तालुक्यातील शेतकरी कापूस विक्रीसाठी मानवत बाजारपेठ जवळ करीत आहेत़ खाजगी परवानाधारक खरेदीदारासह सीसीआयने १ एप्रिलपर्यंत ४ लाख क्विंटलपेक्षा अधिक कापूस खरेदी केल्याची नोंद कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली आहे. बाजारपेठेतील एकूण चित्र पाहाता सद्यस्थितीत कापसाचे दर वाढत असल्याने कापूस विक्री न करता घरात कापूस राखून ठेवलेल्या कापसाने शेतकºयांना तारले आहे़
नगदी पैसे उपलब्ध करून द्या
४मानवत येथील कापसाची बाजार पेठ रोख रक्कमेमुळे प्रसिद्ध आहे़ मात्र मार्च एंडमुळे बँकेतून रक्कम मिळत नसल्याने व्यापाºयांना धनादेशाद्वारे पेमंट द्यावे लागत आहे. ही अडचण सोडविण्यासाठी बँक अधिकाºयांकडे रोख रक्कम उपलब्ध करुन देण्याची मागणी केली असून, तीन ते चार दिवसात बँकांकडून व्यापाºयांना रोख रक्कम उपलब्ध होणार आहे़ रोख रक्कम मिळाल्यास शेतकºयाना धनादेश न देता रोखीने व्यवहार करणे सोपे जाईल, अशी माहिती बाजार समितीचे सभापती गंगाधरराव कदम यांनी दिली़
तीन दिवस होता लिलाव बंद
४मार्चएंडमुळे तीन दिवस लिलाव बंद ठेवल्यानंतर १ एप्रिल रोजी कापूस लिलाव पूर्ववत सुरू करण्यात आला़
४या लिलावात गिरीष कत्रुवार, विजय पोरवाल, युनुस मिलनवाले, भगवान गोलाईत, संदिप पेन्सलवार, गौरव अग्रवाल, रामनिवास टवानी, रामनिवास सारडा, जुगल काबरा, राहुल कडतन आदी खरेदीदार सहभागी झाले होते़