परभणी: कापसाला सर्वाधिक दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:03 AM2019-04-06T00:03:24+5:302019-04-06T00:03:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सेलू ( परभणी ): मागील ५ दिवसांपासून कापसाच्या भावात वाढ होत आहे. शुक्रवारी बाजार समितीच्या कापूस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): मागील ५ दिवसांपासून कापसाच्या भावात वाढ होत आहे. शुक्रवारी बाजार समितीच्या कापूस यार्डात शहरातील खाजगी व्यापाऱ्यांनी लिलाव पद्धतीने खरेदी केलेल्या कापसाला कमाल ६ हजार ३५५ रुपये प्रती क्विंटल एवढा भाव मिळाला. या कापूस हंगामातील हा दर सर्वाधिक असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
या कापूस हंगामात अनेक वेळा कापसाच्या भावात चढ-ऊतार पाहावयास मिळत आहे;परंतु, या आठवड्यात कापसाच्या किंमतीत सतत वाढ होताना दिसत आहे. १ एप्रिल रोजी सेलू शहरात कापसाला ६ हजार १५० रुपये एवढा कमाल भाव मिळाला होता. मात्र गुढी पाडव्याच्या आदल्याच दिवशी कापसाच्या भावात प्रती क्विंटल २०० रुपयाने वाढ झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी बाजार समितीच्या कापूस यार्डात शहरातील खाजगी व्यापाऱ्यांनी लिलाव पद्धतीने खरेदी केलेल्या कापसाला कमाल भाव ६ हजार ३५५ रुपये तर किमान भाव ६ हजार २१५ रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तसेच सरासरी भाव ६ हजार २७५ रुपये होता. यंदा अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने कापसाच्या उत्पादनात निम्म्याहून अधिक घट झाली आहे. कापसाची पहिली वेचणी झाल्यावर कापसाचे भाव मात्र पाहिजे त्या प्रमाणात वाढले नाहीत. त्यामुळे सणासुदीला व घर खर्च आणि मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांना त्यावेळी कवडीमोल भावाने कापूस विक्री करावा लागला; परंतु, एप्रिल महिन्यापासून कापसाच्या भावात वाढ होत आहे. ज्या शेतकºयांनी व व्यापाºयांनी कापूस तसाच ठेवला होता, त्यांना मात्र चांगलाच फायदा झाला आहे.
यंदा : ३ लाख ६० हजार क्विंटल खरेदी
शहरात तालुक्यासह परतूर, मंठा व इतर भागातून कापूस विक्रीसाठी येतो. त्यामुळे दरवर्षी सेलूत कापसाची चांगली खरेदी होते. यावर्षी मात्र दुष्काळामुळे केवळ ३ लाख ६० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. ही खरेदी गतवर्षीच्या तुलनेत निम्मी आहे. शहरात ९ कापूस जिनिंग असून यंदा मात्र चारच जिनिंग सुरू आहेत.
दुष्काळी स्थितीमुळे कापसाचे उत्पन्न
४तालुक्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून कापूस पीक घेतात. त्यातच सिंचनाखाली जमीन कमी आहे. त्यामुळे पावसावरच पिकांचे उत्पन्न अवलंबून आहे. यंदा बाजार समितीच्या आकडेवारीनुसार कापसाच्या उत्पादनात निम्याहून अधिक घट झाली आहे. या पार्श्वभुमीवर कापसाच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे.