परभणी : परदेशी पाहुण्यांनी गजबजला डोंगरमाथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 12:53 AM2020-01-05T00:53:34+5:302020-01-05T00:55:05+5:30

मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आणि जागोजागी निर्माण झालेले नैसर्गिक पाणवठे, तलाव आणि प्रकल्पांमुळे जिंतूर तालुक्याला नैसर्गिक देणगी लाभली असून यावर्षी या गावांतील निसर्ग अधिकच फुुलला आहे. या सौंदर्यात भर घालण्यासाठी विविध विदेशी पाहुण्यांनी तालुक्यातील डोंगरमाथ्यांवर आणि पाणवठ्यांवर ८९ देशी आणि विदेशी पक्ष्यांची नोंद पक्षीमित्रांनी घेतली आहे.

Parbhani: The hillblade of foreign visitors is overwhelming | परभणी : परदेशी पाहुण्यांनी गजबजला डोंगरमाथा

परभणी : परदेशी पाहुण्यांनी गजबजला डोंगरमाथा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आणि जागोजागी निर्माण झालेले नैसर्गिक पाणवठे, तलाव आणि प्रकल्पांमुळे जिंतूर तालुक्याला नैसर्गिक देणगी लाभली असून यावर्षी या गावांतील निसर्ग अधिकच फुुलला आहे. या सौंदर्यात भर घालण्यासाठी विविध विदेशी पाहुण्यांनी तालुक्यातील डोंगरमाथ्यांवर आणि पाणवठ्यांवर ८९ देशी आणि विदेशी पक्ष्यांची नोंद पक्षीमित्रांनी घेतली आहे.
येलदरीसारखा विस्तीर्ण जलाशय, सह्याद्रींच्या डोंगररांगानी जिंतूर तालुक्याला नैसर्गिक सुबत्ता प्राप्त करुन दिली आहे. याशिवाय परभणी जिल्ह्यातील एकमेव वनक्षेत्र जिंतूर तालुक्यातच वसलेले आहे. त्यामुळे निसर्गातील पशु-पक्ष्यांसाठी जिंतूर तालुका हा आवडीचा आणि सुरक्षिततेचाच आधिवास असून दरवर्षी या तालुक्यात वेगवेगळे पक्षी दाखल होतात. पावसाळा संपल्यानंतर तालुक्यातील अनेक गावतलावात आणि छोट्या-मोठ्या पाणवठ्यांमध्ये जलसाठा झालेला असतो. त्यामुळे हे पक्षी पावसाळ्यानंतर या भागात पहावयास मिळतात. तालुक्यातील पक्षीमित्र असलेल्या अनिल उरटवाड, गणेश कुºहा, विजय ढाकणे यांनी ठिकठिकाणी भ्रमंती करुन जुन्या आणि नव्या पक्ष्यांच्या नोंदी टिपल्या आहेत.
अनिल उरटवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्याच्या क्षेत्रात ८९ प्रकारच्या पक्ष्यांची नोंद घेण्यात आली आहे. त्यामध्ये पाण्यावर विहार करणाऱ्या पक्षांबरोबरच डोंगरी आणि वनक्षेत्रातील पक्ष्यांचाही समावेश आहे. वेगवेगळ्या पक्षांनी तालुक्याच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घातली आहे. येलदरी प्रकल्पाचा जलाशय, कवडा येथील डोंगरी भाग, तळ्याचा परिसर, येनोली, नेमगिरी, भोगाव या भागातील तळ्यांच्या परिसरात या पक्ष्यांची नोंद घेण्यात आली आहे.
विदेशातून आलेले पक्षी
४ईरोसीयन स्पूनबिल (चमचा), लेसर व्हीस्टलिंग डक (अढई), स्पॉट बिल डक (हळदी-कुंकू), कॉमन पोचार्ड (लालसरी), टफ्टेड डक (शेंडी बदक), नॉब ब्लिड डक (नकटा बदक), नॉर्थन पिंटाईल (तलवार बदक), नॉर्थन शॉलवेलर (थापट्या बदक), काळ्या डोक्याचा शटारी, गुलाबी मैना, चंद्राग बदक.
स्थानिक पक्षी
४नदी सुरय, टिबुकली, छोटा पान कावळा, गाय बगळा, मोठा बगळा, राखी बगळा, जांभळा बगळा, वंचक, रंगीत करकोचा, पांढºया मानेचा करकोचा, कापसी घार, शिक्रा, पांढºया छातीची पाणकोंबडी, जांभळी पानकोंबडी, वारकरी, शेकाट्या, टिटवी, तपकिरी व्होला, ठिपकेवाला व्होला, कोकिळा, भारद्वाज, नीळकंठ, खंड्या, हुदहुद्या, वेडा राघू, बुलबुल, सूर्यपक्षी, मैना, कोतवाल, कावळा.
चार वर्षांपासून जिंतूर तालुक्यात दाखल होणाºया पक्ष्यांचा अभ्यास करीत आहे. या पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी वारंवार पक्ष्यांच्या निरीक्षणाच्या मोहिमा आखल्या जातात. त्यातूनच या नोंदी घेण्यात आल्या आहेत.
-अनिरु उरटवाड, पक्षीमित्र

Web Title: Parbhani: The hillblade of foreign visitors is overwhelming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.