परभणी: वाळूमाफियांकडून शेतकऱ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 11:46 PM2019-07-09T23:46:58+5:302019-07-09T23:47:26+5:30

गोदावरी नदीपात्रात वाळूचे उत्खनन करण्यास विरोध करणाºया एका शेतकºयास वाळूमाफियाने मारहाण केल्याची घटना ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता धारखेड शिवारात घडली.

Parbhani: Hit the Farmer from Walmafia | परभणी: वाळूमाफियांकडून शेतकऱ्यास मारहाण

परभणी: वाळूमाफियांकडून शेतकऱ्यास मारहाण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : गोदावरी नदीपात्रात वाळूचे उत्खनन करण्यास विरोध करणाºया एका शेतकºयास वाळूमाफियाने मारहाण केल्याची घटना ९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता धारखेड शिवारात घडली.
तालुक्यातील धारखेड येथील शेतकरी माधव अण्णासाहेब बोबडे हे मंगळवारी सकाळी ११ वाजता शेतात काम करीत असताना मोहन रामदास मुरकुटे (वय २५ रा. झोला ता. गंगाखेड) हे ८ ते १० मजुरांना सोबत घेऊन नदीपात्र परिसरात आले. पात्रात वाळूचे खोदकाम करीत असताना माधव बोबडे यांनी खोदकाम करू नका, असे म्हणाले. त्यावेळी मोहन मुरकुटे याने बोबडे यांना शिवीगाळ करीत खोºयाच्या दांड्याने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. माधव बोबडे यांच्या फिर्यादीवरून मोहन मुरकुटे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जमादार हरिभाऊ शिंदे, दत्तात्र पडोळे, रामकिशन कोंडरे तपास करीत आहेत.
गंगाखेड तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे़ चोरून वाळू उपसा करताना अनेक वेळा वाळू माफियांकडून मारहाण केल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत़ त्यामुळे वाळूमाफियांची मुजोरी वाढत असून, तहसील प्रशासनाने वाळू चोरांविरूद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़

Web Title: Parbhani: Hit the Farmer from Walmafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.