परभणी : शासनाच्या परिपत्रकाची केली होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 12:17 AM2018-09-09T00:17:24+5:302018-09-09T00:18:51+5:30

एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाड्यांची संख्या कमी करण्याचा घाट केंद्र शासनाने घातला असून, या संदर्भातील १६ जुलैे २०१८ च्या परिपत्रकाची परभणीत शनिवारी होळी करण्यात आली़

Parbhani: Holi of the government circular | परभणी : शासनाच्या परिपत्रकाची केली होळी

परभणी : शासनाच्या परिपत्रकाची केली होळी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाड्यांची संख्या कमी करण्याचा घाट केंद्र शासनाने घातला असून, या संदर्भातील १६ जुलैे २०१८ च्या परिपत्रकाची परभणीत शनिवारी होळी करण्यात आली़
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हे आंदोलन केले़ चार वर्षांपासून एकात्मिक बालविकास योजनेतील हिस्सा कमी केला जात आहे़ सध्या केवळ २५ टक्के हिस्सा या योजनेंतर्गत दिला जात आहे़
योजनेंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाºयांना किमान वेतनही नाकारले जात आहे़ या विरुद्ध आयटकच्या वतीने ८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़ या आंदोलना दरम्यान, शासनाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली़
१६ जुलै रोजी काढलेल्या या परिपत्रकानुसार २५ पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाड्यांचे समायोजन शेजारच्या अंगणवाडीत करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यामुळे राज्यातील सुमारे २५ हजार अंगणवाड्या बंद करण्याचा घाट घातला जात आहे़
तेव्हा अंगणवाडी सेविका व मदतनिसांना किमान वेतन व मासिक पेन्शन लागू करावी, वाढीव घरभाडे देण्याच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी, १६ जुलै रोजीचे परिपत्रक रद्द करावे, दोन वर्षांपासूनचा थकीत प्रवास भत्ता अदा करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या़
अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या राज्य सचिव अ‍ॅड़ माधुरी क्षीरसागर, सीमा देशमुख, ताहेरा बेगम, अर्चना कुलकर्णी, सुनिता धनले, सविता ढाले, नजमा बेगम, गोदावरी रासवे, आशा गाढे, संगीता ढवळे, राजश्री गाडे, ज्योती कुलकर्णी, रेखा गायकवाड, रेखा पानपट्टे, शाहेदा बेगम, शामा परवीन आदींसह अंगणवाडी सेविका आंदोलनात सहभागी झाल्या होत्या़

Web Title: Parbhani: Holi of the government circular

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.