परभणी : एसआयओच्या वतीने मानवी साखळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:13 AM2018-10-16T00:13:21+5:302018-10-16T00:14:41+5:30
दिल्ली येथील जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थी नजीब अहमद गायब झाल्या प्रकरणाचा नि:पक्षपणे व विशेष तपास यंत्रणेमार्फत तपास करावा, या मागणीसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडियाच्या वतीने १५ आॅक्टोबर रोजी विद्यार्थ्यांची मानवी साखळी करण्यात आली़ तसेच धरणे आंदोलनही करण्यात आले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दिल्ली येथील जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थी नजीब अहमद गायब झाल्या प्रकरणाचा नि:पक्षपणे व विशेष तपास यंत्रणेमार्फत तपास करावा, या मागणीसाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडियाच्या वतीने १५ आॅक्टोबर रोजी विद्यार्थ्यांची मानवी साखळी करण्यात आली़ तसेच धरणे आंदोलनही करण्यात आले़
सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शहरातील स्टुडंट इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडियाच्या परभणी शाखेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाले़ या ठिकाणी मानवी साखळीही तयार करण्यात आली़ यावेळी एसआयओचे राष्ट्रीय अध्यक्ष नहास माला म्हणाले, नजीब अहमदची आई नफिस फातेमा यांना न्याय मिळेपर्यंत एसआयओ संघर्ष करणार आहे़ २०१६ मध्ये नजीब अहमद अचानक गायब झाला़ मात्र त्याच्या संदर्भातील तपासाची फाईल सीबीआयच्या विनंतीवरून बंद करण्यात आली़ या विषयी माला यांनी खंत व्यक्त केली़ या प्रकरणी नफिस फातेमा यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रकरण उच्च न्यायालयात दाखल करणार असून, या प्रकरणात नि:पक्षपणे व विशेष तपास यंत्रणेमार्फत तपास करावा आणि नफिस फातेमा यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली़