परभणी : बुद्धधम्माचे आचरण केल्यास जगाचे कल्याण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:51 AM2018-12-26T00:51:22+5:302018-12-26T00:51:41+5:30
संपूर्ण जगाने बुद्धधम्माचे आचरण केले तर अशांतता, वाईट गोष्टींचा नाश होईल आणि जगाचे कल्याण होईल, असे प्रतिपादन भदंत उपगुप्त महास्थवीर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी) : संपूर्ण जगाने बुद्धधम्माचे आचरण केले तर अशांतता, वाईट गोष्टींचा नाश होईल आणि जगाचे कल्याण होईल, असे प्रतिपादन भदंत उपगुप्त महास्थवीर यांनी केले.
बोरी येथील दीक्षाभूमी मैदानावर २५ डिसेंबर रोजी १३ वी बौद्ध धम्म परिषद पार पडली. सकाळी १० वाजता पू.भदंत प्रज्ञाशिल महाथेरो यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. दुपारच्या सत्रास आ.विजय भांबळे, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे, जि.प. सदस्य रामराव उबाळे, पं.स.चे गटनेते सुभाष घोलप, सखाराम शिंपले, प्रसाद बुधवंत, विजयकुमार चौधरी, माजी सरपंच यशवंतराव चौधरी, शशिकांत चौधरी, ज्योती बगाटे, परमेश्वर साळवे आदींची उपस्थिती होती.
पू.भदंत कश्यप थेरो, पू.भदंत पूर्णबोधी, पू.भदंत धम्मदीप, भदंत मुदितानंद, पू.भदंत धम्ममित्र, पू.भदंत संघरत्न, पू.भदंत प्रज्ञाबोधी, पू.भदंत प्रज्ञापाल, पू.भदंत बोधीशील, भदंत धम्मपाल आदींनी धम्मदेसना दिली. बबनराव रसाळ यांनी प्रास्ताविक केले.
ज्ञानदेव कनकुटे यांनी सूत्रसंचालन केले. धम्म परिषदेच्या यशस्वीतेसाठी अनिल खिल्लारे, उद्धव जावळे, गणेशराव ढेंबरे, प्रकाश घुगे, सुभाष खंदारे, अशोक केशवे, सुलोचनाबाई मोरे, भारत झोडपे आदींनी पुढाकार घेतला.
कार्यक्रमास मराठवाड्यातून हजारो उपासक, उपासिका उपस्थित होत्या. कार्यक्रमात धम्म उपासकांच्या वतीने आ.विजय भांबळे यांच्या हस्ते सिद्धार्थ हत्तींअंबिरे, प्रा.डॉ.संजय जाधव, संजय लहाने, रामराव उबाळे यांचा सत्कार करण्यात आला.
सुविधा देण्यासाठी प्रयत्न करु -भांबळे
४बोरी येथील दीक्षाभूमीचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आ.विजय भांबळे यांनी यावेळी सांगितले. मराठवाडा दीक्षाभूमीवर उपासकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
चिंतनातून धम्म आचरणाची प्रेरणा : हत्तीअंबिरे
४महान बौद्धधम्म चक्राला गतीमान करण्यासाठी विनयसंपन्न भंतेजी व धम्म उपासकांची जबाबदारी मोठी आहे. धम्म परिषदेच्या माध्यमातून धम्मचिंतन होत असते. या चिंतनातूनच धम्म आचरण करण्याची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केले.