परभणी : मनमानी भाडे आकारल्यास बस परवाना निलंबित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 11:48 PM2019-07-02T23:48:20+5:302019-07-02T23:49:08+5:30

खाजगी बसचालकांनी हंगामाच्या नावाखाली मनमानी पद्धतीने प्रवासी भाडे आकारल्यास त्यांचा वाहन परवाना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले असून तक्रारीनंतर विभागाने तीन बसचा परवाना निलंबित केला असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत दिली.

Parbhani: If the cost of arbitrary fare is charged, the bus license will be suspended | परभणी : मनमानी भाडे आकारल्यास बस परवाना निलंबित होणार

परभणी : मनमानी भाडे आकारल्यास बस परवाना निलंबित होणार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : खाजगी बसचालकांनी हंगामाच्या नावाखाली मनमानी पद्धतीने प्रवासी भाडे आकारल्यास त्यांचा वाहन परवाना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले असून तक्रारीनंतर विभागाने तीन बसचा परवाना निलंबित केला असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत दिली.
खाजगी बस वाहतूकदरांकडून उन्हाळ्याच्या सुट्या, दिवाळी आदी हंगामात प्रवासी तिकीटाचे दर दुप्पट आकारुन प्रवाशांची लूट केली जात असल्यासंदर्भात विधान परिषदेत नुकताच तारांकित प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानुसार या तारांकित प्रश्नावर लेखी उत्तर देताना परिवहनमंत्री दिवाकर रावते म्हणाले की, शासनाने २७ एप्रिल २०१८ च्या शासन निर्णयाद्वारे खाजगी कंत्राटी वाहनांच्या कमाल भाडेदर निश्चिती संदर्भात निर्णय घेतला असून खाजगी बसचालकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडे दराच्या ५० टक्केपेक्षा अधिक भाडे दर आकारता येत नाही. खाजगी बसचालकांकडून जादा भाडे दर आकारल्याबाबतच्या या विभागाकडे आजतागायत एकूण ७९ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ६ तक्रारी चौकशीअंती जादा भाडे आकारल्याच्या आढळून आले आहे. यामध्ये ३ बसेसचा परवाना निलंबित करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहेत. तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय वसई यांनी एका प्रकरणात ४ हजार रुपये तसेच कोल्हापूर येथील कार्यालयाने एका प्रकरणात ५ हजार ४०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. शासनाने २७ एप्रिल २०१८ रोजीच्या निर्णयानुसार कंत्राटी प्रवासी वाहनांची कमाल भाडे दर निश्चिती करुन खाजगी बस प्रचालकांकडून जादा भाडेवाढ रोखण्यासाठी खाजगी कंत्राटी वाहनांच्या बुकिंगच्या जागी भेट देण्याचे व कारवाई करण्याबाबतचे तसेच खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात, त्या ठिकाणापासूनचे कि.मी. प्रमाणे खाजगी बस मालकांनी पूर्ण बससाठी आकारावयाचे महत्तम भाडे दराबाबत विहित नमुन्यात तक्ता तयार करावा. त्या प्रमाणे येणारा प्रति आसन दर दर्शवून खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात, अशा ठिकाणी प्रवाशांच्या माहितीसाठी प्रदर्शित करण्यासंदर्भातील आदेश सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देण्यात आले आहेत. तसेच प्रवाशांच्या सोयीकरीता हेल्पलाईन क्रमांक ०२२-६२४२६६६६ व ६६६.३१ंल्ल२स्रङ्म१३.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५ या संकेतस्थळावर जादा भाडे दरासंदर्भात तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे रावते म्हणाले.
परभणी : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कायम
४खाजगी बस चालकांच्या मनमानी प्रवासी भाडेवाढीला राज्य शासनाने लगाम लावला असला तरी त्याची अंमलबजावणी मात्र परभणी जिल्ह्यात होत नसल्याचे दिसून आले आहे. शहरातील रेल्वे स्टेशनसमोर खाजगी प्रवासी बस उभ्या असतात. येथे कोणत्याही प्रकारचा बोर्ड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने लावलेला नाही.
४ दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात काही खाजगी बस चालकांनी दुप्पटीपेक्षा अधिक प्रवासी भाडे आकारले. त्या माध्यमातून प्रवाशांची लूट झाली; परंतु, अशा एकाही खाजगी बसचालकावर परभणीतील अधिकाºयांनी कारवाई केलेली नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या निर्णयाकडे परभणीतील अधिकारी साफ दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बस तपासणीला खो
४एस.टी. महामंडळासह खाजगी प्रवासी वाहतूक करणाºया कालबाह्य झालेल्या अनेक बस शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांवरुन दररोज धावत आहेत; परंतु, या बसची तपासणी करण्याची तसदी परिवहन विभागाकडून घेण्यात आलेली नाही. परिणामी या बसमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Parbhani: If the cost of arbitrary fare is charged, the bus license will be suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.