परभणी : तंत्रज्ञानाचा वापर नियोजनबद्ध केल्यास फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 01:19 AM2019-01-07T01:19:01+5:302019-01-07T01:19:28+5:30
कमी खर्चाचे तंत्रज्ञान, मानवी व जमिनीचे आरोग्य राखणे आणि उत्पादनातील स्थिरता कायम ठेवण्यासाठी सेंद्रीय शेती आशेचा किरण आहे़ या शेतीमध्ये योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतकऱ्यांचा फायदा होवू शकतो, असे प्रतिपादन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ डी़एऩ गोखले यांनी केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कमी खर्चाचे तंत्रज्ञान, मानवी व जमिनीचे आरोग्य राखणे आणि उत्पादनातील स्थिरता कायम ठेवण्यासाठी सेंद्रीय शेती आशेचा किरण आहे़ या शेतीमध्ये योग्य नियोजन आणि तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतकऱ्यांचा फायदा होवू शकतो, असे प्रतिपादन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ़ डी़एऩ गोखले यांनी केले़
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या सेंद्रीय शेती प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ़ गोखले बोलत होते़ यावेळी मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागाचे डॉ़ सय्यद इस्माईल, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य शरद हिवाळे, डॉ़ स्मिता सोळंके, पुणे येथील संजय देशमुख, डॉ़ सतीश भोंडे, महेश सोनकुळ, डॉ़ आनंद गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती़ डॉ़ गोखले म्हणाले, शेतीमध्ये अनेक अडचणी आहेत़ त्यात कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक आणि बाजारभावातील चढउतार या प्रमुख समस्या आहेत़ शेतकºयांनी योग्य बियाणे, अंतरपीक पद्धती, पिकांची फेरपालट या मूलभूत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, युवा शेतकºयांनी शेतीमध्ये पुढे यावे, त्यांच्यातील उर्जा व ज्ञानाचा उपयोग शेती क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरेल़ विशेष म्हणजे सेंद्रीय शेतीमध्ये बाजार व्यवस्थापन महत्त्वाचे असून, बाजारपेठेचा अभ्यास करून सेंद्रीय शेतीत यश मिळविता येते, असे त्यांनी सांगितले़
दिवसभराच्या तांत्रिक सत्रामध्ये पुणे येथील संजय देशमुख यांनी सेंद्रीय शेतीमधील प्रमाणीकरण, महेश सोनकूळ यांनी सेंद्रीय शेतीमध्ये परोपजीवी कीटकांचे व सापळ्यांचे फायदे, डॉ़ सतीश भोंडे यांनी माती परीक्षणाचे महत्त्व, डॉ़ सी़व्ही़ आंबडकर यांनी जैविक रोग व्यवस्थापन, डॉ़ ए़टी़ शिंदे यांनी पशूधन व्यवस्थापन आणि डॉ़ ए़एल़ धमक यांनी जैविक खताची निर्मिती, उपयोग आदीविषयी माहिती दिली़ यावेळी जैविक खत निर्मिती केंद्रास भेट देऊन प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले़ मनीषा वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले़ अभिजीत कदम यांनी आभार मानले़
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संशोधन संचालक डॉ़ दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रल्हाद गायकवाड, डॉ़ सुनील जावळे, शीतल उफाडे, द्वारका काळे, बाळू धारबळे, प्रसाद वसमतकर, सतीश कटारे, भागवत वाघ आदींनी प्रयत्न केले़
एकत्र काम केल्यास खर्चात बचत
४सेंद्रीय शेतीमध्ये प्रमाणीकरणास महत्त्व असून, त्यासाठी शेतकºयांनी एकत्र येऊन काम केल्यास खर्चात बचत होईल, असे सांगून सेंद्रीय शेतीचे तंत्रज्ञान शेतकºयांना सांगितले़ डॉ़ सय्यद इस्माईल म्हणाले, रासायनिक खते व कीटक नाशकांच्या वापराचा अतिरेक झाल्याने मानवी आरोग्यावर परिणाम होतो़ तसेच जमिनीचे आरोग्यही बिघडते़ यामुळे दुहेरी नुकसान होते़ सेंद्रीय शेतीमध्ये निविष्ठांवरील खर्च कमी करता येतो, असे सांगून नेमक्या कोणत्या निविष्ठा वापराव्यात आणि कोणत्या नाही, याची माहिती त्यांनी दिली़ मराठवाडा विभागात सेंद्रीय शेतीचा प्रचार, प्रसार करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले़