परभणी : प्रस्तावित पाणी न मिळाल्यास स्थिती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:12 AM2018-11-14T00:12:48+5:302018-11-14T00:13:26+5:30

जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व धरणांमधून प्रस्तावित केलेले पाणी जायकवाडी प्रकल्पाला मिळाले नाही तर मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.जायकवाडीच्या पाण्यावर जिल्ह्यातील चार तालुक्यांची भिस्त असल्याने परभणी जिल्ह्यालाही मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Parbhani: If the water is not available, then the situation is serious | परभणी : प्रस्तावित पाणी न मिळाल्यास स्थिती गंभीर

परभणी : प्रस्तावित पाणी न मिळाल्यास स्थिती गंभीर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व धरणांमधून प्रस्तावित केलेले पाणी जायकवाडी प्रकल्पाला मिळाले नाही तर मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.जायकवाडीच्या पाण्यावर जिल्ह्यातील चार तालुक्यांची भिस्त असल्याने परभणी जिल्ह्यालाही मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जायकवाडी प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. या प्रकल्पाच्या उर्ध्वभागात नगर, नाशिक जिल्ह्यांमध्ये असलेल्या प्रकल्पांमध्ये पाणी सोडण्याचे आदेश दिलेले असतानाही जायकवाडी प्रकल्पाला पाणी देण्यासाठी आढेवेढे घेतले जात असल्याने मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे आहेत. त्यातच परभणी जिल्ह्यातील अर्धे तालुके जायकवाडी प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने जिल्ह्यालाही दुष्काळाचे चटके सहन करावे लागणार आहेत.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उर्ध्व जायकवाडी व जायकवाडी प्रकल्पामध्ये १५ आॅक्टोबर ते ३१ आॅक्टोबर या काळात पाणी सोडण्याचे निर्देश दिले होते. मात्र १ नोव्हेंबरपासून पाणी सोडण्यात आले. सध्या वरील प्रकल्पांमधून पाणी सोडणे बंद झाले आहे. एकीकडे समन्यायी पाणी वाटपाच्या गोष्टी केल्या जात असताना दुसरीकडे जायकवाडी प्रकल्पाच्या पाण्यामध्ये दरवर्षी कपात केली जात असल्याने त्याचा फटका लाखो हेक्टर शेतीला सहन करावा लागत आहे. यावर्षी शेतीसाठी तर सोडाच, पिण्यासाठीही पाणी उपलब्ध होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
गोदावरी पाटबंधारे महामंडळाने दिलेल्या आदेशानुसार यावर्षी जायकवाडी प्रकल्पामध्ये ८.९९ टीएमसी पाणी सोडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात ११ नोव्हेंबरपर्यंत केवळ ७.९९ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. १ टीएमसी पाण्याची कपात केल्याने मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तेव्हा मराठवाड्याच्या हक्काचे संपूर्ण पाणी प्रकल्पात सोडावे, अशी मागणी परभणी जिल्ह्यातून केली जात आहे.
परभणी जिल्ह्याला सर्वाधिक लाभ
४जायकवाडी प्रकल्पातून निघालेला डावा आणि उजवा कालवा परभणी जिल्ह्यातून प्रवाही झाला आहे. पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा या चार तालुक्यांमध्ये डावा कालवा असून सोनपेठ तालुक्यातून उजवा कालवा गेला आहे. डाव्या कालव्यातून मिळणाऱ्या पाण्यामुळे चारही तालुक्यांमधील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा व चाºयाचा प्रश्न निकाली निघतो. त्याच प्रमाणे कालव्याला पाणी आल्यानंतर भूजल पातळीतही वाढ होते. उन्हाळ्यापूर्वी दरवर्षी जिल्ह्याला किमान सहा पाणी पाळ्या मिळतात. या सहा पाणी पाळ्यावर पुढील वर्षीच्या मे महिन्यापर्यंत पाणी उपलब्ध होते. मात्र जायकवाडी प्रकल्पातील पाण्याची कपात झाली तर परभणी जिल्ह्यातील पाणी पाळीवर परिणाम होऊन दुष्काळाची दाहकता वाढण्याची शक्यता आहे.
प्रत्येकवेळी पाण्याची कपात
४जायकवाडी प्रकल्पामध्ये पाण्याची कमतरता असल्यानंतर वरील धरणांमधून पाणी घेतले जाते. समन्यायी पाणीवाटपाच्या धोरणानुसार मराठवाड्यातील जनतेचा हा हक्क आहे; परंतु, प्रत्येक वेळी अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. २०१४ मध्ये उर्ध्व धरणांमधून जायकवाडी प्रकल्पासाठी ७.८९ टीएमसी पाणी प्रस्तावित करण्यात आले होते. प्रत्यक्षात ७.१० टीएमसी पाणी सोडण्यात आले. २०१५ मध्ये १२.८४ टीएमसी पाणी प्रस्तावित केले होते. प्रत्यक्षात १०.४० टीएमसी पाणी सोडण्यात आले. यावर्षी देखील प्रस्तावित केलेल्या पाण्याच्या तुलनेत १ टीएमसी पाणी कमी दिले असल्याचा उल्लेख अभिजीत जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केला आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविले पत्र
४जायकवाडी प्रकल्पात सोडण्यात आलेल्या प्रस्तावित पाण्याची कपात केल्याने मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. यावर्षी ८.९९ टीएमसी पाणी सोडण्याचे प्रास्तावित करण्यात आले आहे. प्रत्यक्षात ७.९९ टीएमसी पाणी देण्यात आले. उर्ध्व प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला असून हक्काचे पाणी कपात केल्यामुळे अन्याय निर्माण झाला आहे. मागील दोन वर्षांची परिस्थिती लक्षात घेता यावर्षी देखील पाण्याची कपात होण्याची शक्यता आहे. तेव्हा मराठवाड्यातील परिस्थिती लक्षात घेऊन प्रस्तावित पाणी तातडीने जायकवाडी प्रकल्पात सोडावे, अशी मागणी अभिजीत जोशी यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Web Title: Parbhani: If the water is not available, then the situation is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.