परभणी :चारठाणा परिसरातून अवैध वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:20 AM2017-12-26T00:20:29+5:302017-12-26T00:20:38+5:30
जिंतूर तालुक्यातील चारठाणा परिसरातील करपरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरु आहे. जेसीबी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने रात्र-दिवस वाळूची वाहतूक केली जात असून ठिकठिकाणी साठे तयार केले जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चारठाणा : जिंतूर तालुक्यातील चारठाणा परिसरातील करपरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरु आहे. जेसीबी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने रात्र-दिवस वाळूची वाहतूक केली जात असून ठिकठिकाणी साठे तयार केले जात आहेत.
चारठाणा परिसरातील सेलू तालुक्यातील निरवाडी, सावंगी पी.सी., वाई, बोथ, खैरी आदी शिवारातून करपरा नदी वाहते. मागील काही दिवसांपासून या भागातून अवैध वाळू उपसा सुरु आहे. जेसीबीच्या साह्याने वाळू उपसा करुन परिसरामध्ये साठे निर्माण केले जात आहेत. तसेच बाहेर जिल्ह्यातही वाळू पाठविली जात आहे.
महसूल प्रशासन मात्र कारवाई करताना दिसून येत नाही. त्यामुळे वाळू माफियांचे मनोबल उंचावले आहे. वाळूच्या वाहतुकीमुळे रस्त्यांचीही दूरवस्था होत असून ग्रामस्थ वाळू वाहतुकीस विरोध करीत आहेत. वाळूमाफियांच्या उपद्रवाला परिसरातील ग्रामस्थही वैतागले आहेत. याकडे लक्ष देऊन अवैध वाळू उपसा थांबवावा, अशी मागणी ग्रामस्थांमधूून होत आहे.