परभणी: आदेशाची अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 10:56 PM2019-04-07T22:56:41+5:302019-04-07T22:57:01+5:30
पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्याचे आदेश राज्य शासनाने काढले असून आचारसंहिता संपताच या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी मराठवाडा पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेने केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्याचे आदेश राज्य शासनाने काढले असून आचारसंहिता संपताच या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी मराठवाडा पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेने केली आहे.
पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचा अहवाल ६ सप्टेंबर २०१८ रोजी या संदर्भात स्थापन केलेल्या समितीने दिला होता. या अनुषंगाने ११ डिसेंबर २०१८ रोजी मंत्रीमंडळाने निर्णय घेतला व २ मार्च २०१९ रोजी अंशकालीन कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याचे आदेश देण्यात आले.
परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पदवीधर अंशकालीन कर्मचारी आहेत. या कर्मचाºयांच्या याद्याही तयार आहेत. तेव्हा जिल्ह्यातील रिक्त जागांचा आढावा घेऊन अंशकालीन कर्मचाºयांना आचारसंहितेनंतर तात्काळ नियुक्ती आदेश द्यावेत, अशी मागणी अंशकालनी कर्मचारी संघटनेने केली आहे.
या संघटनेच्या पदाधिकाºयांनी नुकतीच जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांची भेट घेतली. यावेळी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गुणीरत्न वाकोडे, सुरेश शिंदे, संजय पांडे, रेड्डीसिंग बावरी, अर्जून शेळके, मनोहर शेळके, प्रकाश पारवे, सुग्रीव वाघमारे, रामचंद्र बाजगिरे, धनंजय रणसिंग, मोहन रासकडला, मनोहर आर्वीकर, रविंद्र चव्हाण आदींची उपस्थिती होती.