परभणी : आधारअभावी धान्य वितरणात अडथळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:17 AM2018-10-29T00:17:23+5:302018-10-29T00:17:36+5:30

जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभार्थी असलेल्या ७४ हजार १३९ शिधापत्रिका धारकांच्या अंगठ्याचे ठसे प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने या शिधापत्रिका धारकांना रेशनचे धान्य वितरित करताना अडचणी निर्माण होत आहेत़ विशेष म्हणजे, या लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे ठसे उपलब्ध झाले नाही तर नोव्हेंबर महिन्यात हे लाभार्थी धान्यापासूनही वंचित राहू शकतात़ तेव्हा प्रशासनाने शिधापत्रिकाधारकांना ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे़

Parbhani: Inadequate food distribution obstacles | परभणी : आधारअभावी धान्य वितरणात अडथळे

परभणी : आधारअभावी धान्य वितरणात अडथळे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत लाभार्थी असलेल्या ७४ हजार १३९ शिधापत्रिका धारकांच्या अंगठ्याचे ठसे प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याने या शिधापत्रिका धारकांना रेशनचे धान्य वितरित करताना अडचणी निर्माण होत आहेत़ विशेष म्हणजे, या लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे ठसे उपलब्ध झाले नाही तर नोव्हेंबर महिन्यात हे लाभार्थी धान्यापासूनही वंचित राहू शकतात़ तेव्हा प्रशासनाने शिधापत्रिकाधारकांना ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे़
जिल्ह्यात ई-पॉस मशीनच्या सहाय्यानेच रेशनचे धान्य वाटप करण्याची प्रक्रिया जून २०१७ पासून सुरू करण्यात आली आहे़ जून महिन्यापासून आतापर्यंत २ लाख ६७ हजार ४१३ शिधापत्रिका धारकांची आधार नोंदणी झाली असून, या शिधापत्रिका धारकांना ई-पॉसच्या सहाय्याने धान्य वाटप सुरू आहे़ मार्च २०१८ पासून जिल्ह्यामध्ये एईपीडीएस ही प्रणाली लागू झाली आहे़ या प्रणाली अंतर्गत आधार क्रमांकाबरोबरच लाभार्थ्याचा अंगठा ई-पॉस मशीनवर जुळवणी झाल्याशिवाय धान्य वितरण करणे अशक्य झाले आहे़ त्यामुळे ७४ हजार लाभार्थ्यांचे अंगठ्याचे ठसे उपलब्ध नसल्याने हे लाभार्थी धान्यापासून वंचित राहू शकतात़
नोव्हेंबर महिन्यात ई-पॉस मशीनद्वारे धान्य वाटप करण्यासाठी नव्याने आधार सिडींग केलेला डाटा वापरला जाणार आहे़ हे काम जलदगतीने पूर्ण केले जाणार असून, ज्या लाभार्थ्यांच्या कुटूंबातील काही सदस्यांचे आधार नोंदविले नसतील, अशा सदस्यांनी रास्तभाव दुकानदारांकडे असलेल्या ई-पॉस मशीनवर अंगठ्याचा ठसा ठेवून आधार क्रमांक नोंदविल्यास त्या सदस्याची आधार सिडींग होणार आहे़ तेव्हा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ३१ आॅक्टोबरपूर्वी रास्तभाव दुकानदारांकडे आधार क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे़
...तर रद्द होणार शिधापत्रिका
४सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत १ डिसेंबर २०१८ पासून आतापर्यंत कुटूंबातील एकाही लाभार्थ्याचा आधार क्रमांक नोंद झालेला नसेल तर ती शिधापत्रिका रद्द केली जाणार आहे़ त्यामुळे ज्या कुटूंबातील एकाही सदस्याचे आधार क्रमांक नोंदविलेले नाहीत, त्यांनी ३० आॅक्टोबरपूर्वी तहसील कार्यालयात जाऊन सर्व सदस्यांचे आधार क्रमांक नोंदणी करून घ्यावेत, अन्यथा अशा शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिका रद्द कराव्या लागतील़ नवीन शिधापत्रिकेसाठी पुन्हा तहसील कार्यालयात अर्ज करावा लागेल़ ही गैरसोय टाळण्यासाठी शिधापत्रिकाधारकांनी तत्काळ आधार सिडींग करावे, असे आवाहन करण्यात आहे़

Web Title: Parbhani: Inadequate food distribution obstacles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.