परभणी : इनामदार यांचे नाव आपणच सुचविले -प्रणिता नवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:26 AM2019-02-03T00:26:07+5:302019-02-03T00:27:21+5:30

येथील महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी आपणच अतिक इनामदार यांचे नाव राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी आणि गटनेते जलालोद्दीन काजी यांना सुचविले होते. आपल्या विनंतीनुसारच त्यांचा अर्ज भरला होता, अशी माहिती दिवंगत नगरसेवक अ‍ॅड.विष्णू नवले यांच्या पत्नी प्रणिता नवले यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

Parbhani: Inamdar's name suggests itself - Pranita Navale | परभणी : इनामदार यांचे नाव आपणच सुचविले -प्रणिता नवले

परभणी : इनामदार यांचे नाव आपणच सुचविले -प्रणिता नवले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदासाठी आपणच अतिक इनामदार यांचे नाव राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी आणि गटनेते जलालोद्दीन काजी यांना सुचविले होते. आपल्या विनंतीनुसारच त्यांचा अर्ज भरला होता, अशी माहिती दिवंगत नगरसेवक अ‍ॅड.विष्णू नवले यांच्या पत्नी प्रणिता नवले यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.
परभणी मनपातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वाट्याला आलेल्या स्वीकृत सदस्यपदावरुन शुक्रवारपासून पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.स्वराजसिंह परिहार, विरोधी पक्षनेते विजय जामकर व इतर १३ नगरसेवकांनी पक्षाच्या वतीने यापूर्वी स्वीकृत सदस्यपदासाठी भरलेला अतिक इनामदार यांचा अर्ज रद्द करण्याचे निवेदन मनपा आयुक्तांना दिले होते. तर नगरसेवकांना विचारात न घेता मनमानी पद्धतीने इनामदार यांचा अर्ज दाखल केल्याच्या कारणावरुन १३ नगरसेवकांनी आपल्याकडे राजीनामे दिल्याचे अ‍ॅड. परिहार यांनी सांगितले होते. त्यानंतर शनिवारी या संदर्भात परभणीत शाही मशीद परिसरातील कार्यालयात आ.दुर्राणी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी अ‍ॅड.विष्णू नवले यांच्या पत्नी प्रणिता नवले यांची स्वाक्षरी असलेले प्रसिद्धी पत्रक अ‍ॅड. नवले यांचे मेहुणे डॉ.संजय व रवि पवार यांनी पत्रकारांना दिले. निवेदनात प्रणिता नवले यांनी म्हटले आहे की, अ‍ॅड.विष्णू नवले यांच्या निधनानंतर मनपातील स्वीकृत सदस्यपद स्वीकारावे, अशी विनंती आ.दुर्राणी व गटनेते काजी यांनी आपल्या घरी येऊन केली होती; परंतु, आपणास राजकीय क्षेत्रात पुरेसा अनुभव नसल्याने व पतीच्या निधनातून अद्याप सावरले नसल्याने दिवंगत अ‍ॅड. नवले यांचे बालमित्र अतिक अहेमद इनामदार यांना स्वीकृत सदस्यपद देण्याची विनंती आ. दुर्राणी यांच्याकडे केली. त्या विनंतीचा आदर राखून गटनेते काजी यांनी इनामदार यांचा अर्ज दाखल केला; परंतु, अ‍ॅड.नवले ऐवजी आपणास स्वीकृत सदस्यपद मिळावे, यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या काही इच्छुकांनी त्यांची अपेक्षा व मागणी पूर्ण न झाल्याने आ.दुर्राणी यांच्यावर मनमानीचे खोटे आरोप लावले आहेत. या उलट पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व आ.दुर्राणी यांनी आपल्या कुटुंबास न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला, असेही प्रणिता नवले यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
बदनामी करण्यासाठीच खोटे आरोप -दुर्राणी
४ज्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची परभणी शहरात एक शाखाही स्थापन केली नाही किंवा एक बुथ कमिटीही स्थापन केली नाही, असे व्यक्ती पक्षनिष्ठेच्या ढोंगी गप्पा मारत आहेत. केवळ आपली बदनामी व्हावी, या हेतुनेच त्यांनी इनामदार यांच्या उमेदवारीचे कारण पुढे केले आहे. इनामदार यांचे नाव प्रणिता नवले यांनीच सूचविले होते. त्यामुळे त्यामध्ये आपण कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. अ‍ॅड. विष्णू नवले हे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आपण पूर्वीही होतो आणि आताही आहे. अ‍ॅड. नवले यांच्याविषयी कळवळा दाखविणारे नवले कुटुंबियांना आतापर्यंत कधी भेटलेही नाहीत. केवळ आर्थिक अपेक्षा ठेवून संबंधितांनी इनामदार यांच्या अर्जाला विरोध केला गेला आहे, अशी प्रतिक्रिया आ.दुर्राणी यांनी दिली.
कळवळा दाखविणारे कधीही भेटले नाहीत -पवार
४प्रणितातार्इंवर अन्याय झाल्याचा कळवळा दाखविणारे पदाधिकारी कधीही आपणास किंवा आपल्या कुटुंबियास भेटले नाहीत. केवळ राजकीय आकसातून आ.दुर्राणी यांच्यावर खोटे आरोप करीत आहेत. इनामदार यांचे नाव आम्हीच दुर्राणी यांना सूचविले होते, अशी प्रतिक्रिया अ‍ॅड.नवले यांचे मेहुणे डॉ.संजय पवार आणि रवि पवार यांनी दिली.

Web Title: Parbhani: Inamdar's name suggests itself - Pranita Navale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.