परभणी : उरुसातून १८ लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:42 PM2019-02-25T23:42:17+5:302019-02-25T23:42:38+5:30
येथील हजरत सय्यद शाह तुराबूल हक यांच्या ऊरुसामध्ये जिल्हा वक्फ बोर्डाला १८ लाख ४ हजार रुपयांचे उत्पन्न झाले आहे. परभणी येथील ऊरुस राज्यभरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या काळात शहरामध्ये ऊरुस भरविला जातो. ऊरुसासाठी देशभरातील व्यापारी परभणीत येऊन व्यवसाय करतात. या व्यापाऱ्यांना जिल्हा वक्फ बोर्डाच्या माध्यमातून दुकाने उपलब्ध करुन दिली जातात.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील हजरत सय्यद शाह तुराबूल हक यांच्या ऊरुसामध्ये जिल्हा वक्फ बोर्डाला १८ लाख ४ हजार रुपयांचे उत्पन्न झाले आहे.
परभणी येथील ऊरुस राज्यभरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या काळात शहरामध्ये ऊरुस भरविला जातो. ऊरुसासाठी देशभरातील व्यापारी परभणीत येऊन व्यवसाय करतात. या व्यापाऱ्यांना जिल्हा वक्फ बोर्डाच्या माध्यमातून दुकाने उपलब्ध करुन दिली जातात. राहट पाळणे, गेम शो, मनोरंजनाची साधने, छोटे व्यावसायिक यांच्याकडूनही वक्फ बोर्ड किरायापोटी रक्कम वसूल करते. यावर्षीच्या ऊरुसामध्ये ५८० दुकाने भाडेतत्वावर देण्यात आली होती. तसेच या दुकानांशिवाय रस्त्यांवर स्टॉल लावलेल्या लघु विक्रेत्यांकडूनही वक्फ बोर्डाने भाडे वसूल केले आहे. शोलाईनसाठी १५ ब्लॉक किरायाणे दिले होते. या सर्व बाबींमधून जिल्हा वक्फ बोर्डाला ३० लाख ३० हजार १९७ रुपये प्राप्त झाले. त्यातून मीना बाजाराची उभारणी करण्यासाठी १२ लाख ७४ हजार रुपये, ऊरुसाच्या प्रसिद्धीसाठी ३० हजार रुपये, संदल व इतर कार्यक्रमांसाठी २५ हजार रुपये, दर्गा आणि मशिदीचे थकलेले वीज बिल अदा करण्यासाठी २ लाख ७५ हजार रुपये असा १५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. खर्च वजा जाता जिल्हा वक्फ बोर्डाला १८ लाख ४ हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले असल्याची माहिती बोर्डाच्या वतीने देण्यात आली.
दरम्यान, ऊरुस शांततेत पार पाडण्यासाठी वक्फ बोर्डाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजीज अहमद, जिल्हा वक्फ अधिकारी शेख जिलानी, खुसरो खान, नखी अली, आयुब खान, रियाज अहमद, अल्ताफ खान, जमीर खान यांच्यासह जिल्हा वक्फ बोर्डातील अधिकारी, कर्मचारी, महापालिका व जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
अनेक पटीने वाढले बोर्डाचे उत्पन्न
४जिल्हा वक्फ बोर्डाला मागील वर्षी केवळ २ हजार रुपयांचे उत्पन्न ऊरुसातून मिळाले होते. यावर्षी ते १८ लाखापर्यंत पोहचले आहे. विशेष म्हणजे यावर्षी विद्युत कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराने मोफत सेवा दिली. त्यामुळे विद्युत सेवेवरील खर्चाची बचत झाली असून वक्फ बोर्डाच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झाली आहे. या उत्पन्नातून दर्गामध्ये रंगरंगोटी करणे, दर्गा, मशिदीचे नियमित वीज बिल भरणे. तसेच वक्फ बोर्डातील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च भागविला जाणार आहे.