परभणी : ग्रामीण युवकांशी समन्वय वाढवा - पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:29 AM2018-07-30T00:29:40+5:302018-07-30T00:31:22+5:30
ग्रामीण भागात पोलीस अधिकारी, कर्मचाºयांनी सुसंवाद वाढवावा, अशा सूचना करीत असतानाच नवयुवकांनाही विश्वासात घेऊन त्यांना आंदोलनातून होणाºया नुकसानीची माहिती द्यावी, अशा सूचना नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निशिथ मिश्रा यांनी पोलीस अधिकाºयांना दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : ग्रामीण भागात पोलीस अधिकारी, कर्मचाºयांनी सुसंवाद वाढवावा, अशा सूचना करीत असतानाच नवयुवकांनाही विश्वासात घेऊन त्यांना आंदोलनातून होणाºया नुकसानीची माहिती द्यावी, अशा सूचना नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निशिथ मिश्रा यांनी पोलीस अधिकाºयांना दिल्या.
गुरुवारी मराठा समाजाच्या आंदोलनावर लाठीमार केल्याच्या निषेधार्थ शनिवारी परभणी जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान पोलिसांवर दगडफेक तसेच पोलिसांना मारहाण करण्याची घटना घडली. या आंदोलनात अधिकतर नवयुवकांचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोलीस महानिरीक्षक निशिथ मिश्रा यांनी परभणीत भेट दिली. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाºयांशी संवाद साधून मागील दोन-तीन दिवसांत घडलेल्या घटनांचा आढावा घेतला. पोलीस अधिकारी, कर्मचाºयांवरच आंदोलकांनी दगडफेक, मारहाण केल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माहितीही घेतली. या आंदोलनामध्ये नवयुवक आक्रमक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावर पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांनी ग्रामीण भागात संपर्क वाढवावा, साध्या वेषात जावून थेट या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ शकते, हे पटवून द्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जखमी पोलीस कर्मचाºयांची केली विचारपूस
शनिवारी आंदोलनादरम्यान टाकळी कुंभकर्ण येथे झालेल्या दगडफेक व मारहाणीच्या घटनेत पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडाळकर, फौजदार उदय सावंत, योगेश सानप, जनार्दन चाटे, सुरेश सुरनर, जे़जे़ कदम, राजकुमार बचाटे, ज्ञानेश्वर लिंबाळकर, साईनाथ मिठेवाड हे कर्मचारी जखमी झाले होते. या सर्व जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, रविवारी पोलीस महानिरीक्षक निशीथ मिश्रा यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन सर्व जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.
यावेळी त्यांनी नेमकी घटना कशी घडली, याचीही माहिती जाणून घेतली. याप्रसंगी पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, नानलपेठचे पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर, वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे आदींची उपस्थिती होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत आगामी काळात करावयाच्या उपाययोजनांबाबत अधिकाºयांना सूचनाही केल्या.