परभणीत दुपटीने वाढविला दारूचा साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:53 AM2018-12-31T00:53:35+5:302018-12-31T00:54:34+5:30
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दारु, मांसाहार करीत जल्लोष करण्याची प्रथा मागील काही वर्षांपासून रुढ झाली असून या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील व्यावसायिकांनीही तयारी सुरु केली आहे. मांसाहारासह दारूचा दुप्पट साठा करुन ठेवण्यात आला असून नववर्षाच्या स्वागतासाठी व्यावसायिक सज्ज झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दारु, मांसाहार करीत जल्लोष करण्याची प्रथा मागील काही वर्षांपासून रुढ झाली असून या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील व्यावसायिकांनीही तयारी सुरु केली आहे. मांसाहारासह दारूचा दुप्पट साठा करुन ठेवण्यात आला असून नववर्षाच्या स्वागतासाठी व्यावसायिक सज्ज झाले आहेत.
जिल्ह्यातील नववर्षाच्या स्वागताचे वेध ३० डिसेंबरपासून लागले आहेत. ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप देत देत नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या स्वागतासाठी जिल्ह्यातील विविध हॉटेल्स, ढाबे आणि इतर ठिकाणी एकत्र येऊन सिलेब्रिशन केले जाते. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या रात्री हॉटेल्स आणि ढाब्यांवर फुल्ल गर्दी होते. दरवर्षी ३१ डिसेंबरच्या दिवशी होणारी ही गर्दी लक्षात घेऊन व्यावसायिकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. या तयारीचा आढावा घेतला असता दररोज विक्री होणाऱ्या दारु आणि मांसाहाराच्या तुलनेने दुप्पट स्टॉक करण्यात आला आहे.
परभणी शहर व परिसरात ७ वाईन शॉप, १७ परमीट रुम, २४ बिअरबार आणि देशी दारुचे ९ परवानाधारक आहेत. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर या सर्वांनीच दारुचा दुप्पट साठा करुन ठेवला आहे. दररोज विक्री होणाºया दारुपेक्षाही अधिक दारु विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवली आहे. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सुमारे १७०० पेटी दारु जास्तीची मागविण्यात आली आहे.
एका पेटीमध्ये १८० एमएलच्या ४८ बाटल्या असतात. सर्वसाधारणपणे देशी दारुच्या ४०० पेटी, विदेशी दारुच्या ६०० पेटी आणि ७०० पेटी बीअर जास्तीची मागविण्यात आली आहे. विशेष म्हणजे ३१ डिसेंबर रोजी वाईनशॉप रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली असून परमीट रुमला पहाटे ५ वाजेपर्यंतची परवानगी देण्यात आली आहे.
नववर्षाचे स्वागत करीत असताना हॉटेल्समधून शाकाहाराबरोबरच मोठ्या प्रमाणात मांसाहारही केला जातो. ही बाब लक्षात घेऊन व्यावसायिकांनी चिकन, मटणचाही स्टॉक वाढविला आहे. सर्वसाधारणपणे शहर परिसरात विक्री होणाºया मांसाहाराच्या तुलनेत ८ ते १० पट वाढीव स्टॉक केल्याची माहिती येथील व्यावसायिकांनी दिली. बारामती, नगर, पुणे, हैदराबाद आदी ठिकाणाहून हा स्टॉक मागविला असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
एकंदर नववर्षाच्या स्वागतासाठी रविवारपासूनच जिल्ह्यात तयारी सुरू करण्यात आली आहे. शहरातही अनेक ठिकाणी नववर्षाच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत. दोन दिवसांपासूनच नववर्षाच्या स्वागताची लगबग सुरू झाली असून, युवकांचा उत्साह लक्षात घेऊन व्यावसायिकांनी आधीपासूनच तयारी करुन ठेवली आहे.
पोलिसांचाही राहणार तगडा बंदोबस्त
थर्टीफस्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस प्रशासनाने अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावला आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यप्राशन करुन धोकादायकरित्या वाहने चालविली जातात. तसेच हॉटेल्स, ढाबे, लॉजवर अप्रिय घटना होण्याची शक्यता असते. या काळात पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष काळजी घेतली जाणार आहे. स्थानिक गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी पथक, वाहतूक शाखा, जिल्हा विशेष शाखेचा बंदोबस्त ठिकठिकाणी लावण्यात आला आहे. स्थानिक गुन्हा शाखा व जिल्हा विशेष शाखेच्या साध्या वेषातील कर्मचाºयांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने कळविले आहे. बंदोबस्तासाठी ६ स्ट्रायकिंग फोर्स, पोलीस नियंत्रण कक्षातील राखीव बंदोबस्त, दोन जलद प्रतिसाद पथक, तीन आरसीपी प्लाटून तैनात ठेवण्यात आल्या आहेत. बॉम्बशोधक नाशक पथक, दहशतवाद विरोधी पथकाच्या वतीनेही जिल्ह्यात तपासणी केली जाणार आहे. रात्रीच्या गस्तीवरील अधिकारी- कर्मचाºयांना पोलीस अधीक्षकांनी विशेष सूचनाही दिल्या आहेत.
केकची विक्रीही वाढणार
४नववर्षाचे स्वागत करीत असताना केक कापून जल्लोष केला जातो. त्यामुळे या दिवशी केकलाही चांगलीच मागणी वाढते. फ्रेश क्रीम आणि बटर क्रीम असे दोन प्रकारचे केक ग्राहकांच्या पसंतीस उतरतात. बेकरी विक्रेत्यांनी ग्राहकांची ही वाढती मागणी लक्षात घेऊन केकचा स्टॉकही दुप्पटीने वाढविला आहे.