परभणी : बँकेकडे अनुदान वर्ग करण्यास पाथरी उदासिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 12:22 AM2019-12-24T00:22:15+5:302019-12-24T00:23:00+5:30
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तालुक्याला १७ कोटी ९४ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली असली तरी अद्यापही ही रक्कम बँकेकडे वर्ग केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तालुक्याला १७ कोटी ९४ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली असली तरी अद्यापही ही रक्कम बँकेकडे वर्ग केली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे़
तालुक्यातील खरिपाची पिके अतिवृष्टीने पाण्याखाली गेली़ उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला होता़ राज्य शासनाने जाहीर केलेल्या मदतीपैकी पहिल्या टप्प्यात ८ कोटी २१ लाख रुपये या तालुक्याला प्राप्त झाले़ ही रक्कम १४ गावांतील शेतकºयांना मदत म्हणून वाटप करण्यात आली़ दुसºया टप्प्यात १३ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयाला १७ कोटी ९४ लाख रुपये प्राप्त झाले़ ही रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे वर्ग केली जाते; परंतु, महसूल प्रशासनाने अद्यापही नुकसानीची रक्कम बँकेकडे वर्ग केली नाही़ त्यामुळे शेतकºयांच्या खात्यावरही मदत निधी जमा होण्यास विलंब लागणार असल्याने शेतकºयांमध्ये संताप व्यक्त होत आहे़ अनुदानाची रक्कम उपलब्ध होवूनही महसूल प्रशासन विलंब लावत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे़ विशेष म्हणजे जिल्ह्यातील इतर सर्व तहसील कार्यालयांनी त्यांना प्राप्त झालेली रक्कम बँकेकडे वर्ग केली आहे. सेलू आणि पूर्णा तालुक्यात अजून हे काम बाकी आहे. मात्र पाथरी तहसील कार्यालयातून अद्यापही बँकेकडे रक्कम वर्ग केली नसल्याने हा तालुका मागे पडला असून, शेतकºयांत संताप व्यक्त होत आहे.
अडचणीत तरी मदत करा
४अतिवृष्टीने शेतकरी आर्थिक पेचात सापडला आहे़ शासनाने या शेतकºयांसाठी मदतनिधी देवू केला़; परंतु, हा निधी शेतकºयांच्या खात्यावर वर्ग केला जात नाही़
४निष्क्रीय यंत्रणा आणखी किती दिवस शेतकºयांना वेठीस धरणार आहे? असा सवाल करीत अडचणीच्या काळात तरी अनुदानाचे त्वरित वाटप करावे, अशी मागणी बाजार समितीचे उपसभापती एकनाथ शिंदे यांनी केली आहे़
पहिल्या टप्प्यातील दुष्काळी अनुदान बँकेकडून वाटप करण्यात आले़ मात्र दुसºया टप्प्यातील अनुदान आजपर्यंत बँकेला प्राप्त झाले नाही़
-एच़एम़ टोणगे, शाखा व्यवस्थापक, पीडीसीसी बँक, पाथरी