परभणी : मकर संक्रांतीच्या सणावर महागाईचे मळभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 12:02 AM2020-01-15T00:02:09+5:302020-01-15T00:03:13+5:30
तीळ आणि गुळाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनातील गोडवा वाढविणाऱ्या यावर्षीच्या संक्रांतीवर मात्र महागाईचे मळभ दिसत आहेत़ बुधवारी जिल्हाभरात मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जात असून, या पार्श्वभूमीवर मंगळवारी बाजारपेठेमध्ये पुजेच्या साहित्यासह संक्रांतीसाठी लागणाºया वाणाचे साहित्य महागल्याचे पहावयास मिळाले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तीळ आणि गुळाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनातील गोडवा वाढविणाऱ्या यावर्षीच्या संक्रांतीवर मात्र महागाईचे मळभ दिसत आहेत़ बुधवारी जिल्हाभरात मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जात असून, या पार्श्वभूमीवर मंगळवारी बाजारपेठेमध्ये पुजेच्या साहित्यासह संक्रांतीसाठी लागणाºया वाणाचे साहित्य महागल्याचे पहावयास मिळाले़
पौष महिन्यामध्ये साजरा केला जाणारा मकर संक्रांती हा सण शेतीशी निगडीत असलेला सण आहे़ शेतामध्ये आलेल्या माळव्याची आणि धान्याचे वाण सुगड्यातून महिला एकमेकींना देवून हा सण साजरा करतात़ त्यामध्ये हरभरे, उस, बोर, गव्हाची ओंबी, तीळ, बिबव्याची फुले हे साहित्य सुगड्यात भरून देवाला अर्पण केले जाते़ मकरसंक्रांत हा महिलांचा सण असून, या सणासाठी लागणारे साहित्य परभणीच्याबाजारपेठेत दाखल झाले आहे. दोन दिवसांपासून येथील गांधी पार्क, क्रांती चौक, काळी कमान, देशमुख हॉटेल या भागात वाणासाठीचे साहित्य विक्रीसाठी आलेले आहे़ हळदी, कुंकू, रांगोळी याबरोबरच सुगडे, बिबव्याची फुले, वाळकं, हरभºयाचे टहाळ, ऊस कांडे, पेरू, करडईचे फुले आदी साहित्याची दोन दिवसांपासून विक्री होत असून, बाजारपेठ ग्राहकांनी फुलली आहे़ यावर्षी या बाजारपेठेवर महागाईचे सावट दिसून आले़
शेत शिवारांमध्ये वाळकांची आवक कमी असल्याने वाळकांची विक्री ८० रुपये किलो प्रमाणे विक्री झाली़ त्याच प्रमाणे बिबव्याची फुले १० रुपयांना दोन, सुगडे ३५ रुपयांना ५, ऊसाचे कांडे ५ रुपयांना एक, ओंब्या ५ रुपयांना ५, बोरं ५ रुपयांना एक ग्लास, वाल्याच्या शेंगा, २५ रुपये भाव या दराने विक्री झाल्या आहेत़
तीळ, गुळाचे दर स्थिर
४संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तीळ आणि गुळाची मोठ्या प्रमाणात विक्री होते़ ही बाब लक्षात घेवून बाजारपेठेत तिळाची तसेच गुळाची आवक वाढली आहे़ तीळ १३० ते १४० रुपये किलो या दराने विक्री झाले़
४तर गुळाची विक्री ४० ते ५० रुपये किलो दराने झाली़ मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तीळ आणि गुळाचे दर स्थिर असल्याची माहिती विक्रेते राजू देशमुख यांनी दिली़ तीळामध्ये गावरान तीळ ११० ते १२० रुपये किलो या दरा प्रमाणे विक्री झाले़
४तर गुजरातहून आलेल्या तीळाला मात्र १४० रुपयांचा दर मिळाला आहे़ गुळही तीन प्रकारे असून, गावरान गुळ ४० रुपये किलो, पॅकींगचा गुळ ४५ रुपये किलो तर सेंद्रीय गुळ ७० किलो प्रमाणे विक्री झाला़