परभणी : पिकांवर हुमनी अळीचा प्रादूर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 11:20 PM2019-08-06T23:20:27+5:302019-08-06T23:21:10+5:30

अधुन-मधून पडणाऱ्या मध्यम पावसाच्या सरीने खरीप पिकांना तात्पुरते जीवदान दिले आहे; परंतु, हुमनी अळीच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे मोठ्या प्रमाणात पिकांना धोका निर्माण झाला आहे.

Parbhani: Influence of Humani aloe on crops | परभणी : पिकांवर हुमनी अळीचा प्रादूर्भाव

परभणी : पिकांवर हुमनी अळीचा प्रादूर्भाव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा (परभणी) : अधुन-मधून पडणाऱ्या मध्यम पावसाच्या सरीने खरीप पिकांना तात्पुरते जीवदान दिले आहे; परंतु, हुमनी अळीच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे मोठ्या प्रमाणात पिकांना धोका निर्माण झाला आहे.
पूर्णा तालुक्यात सोयाबीन, कापूस हे खरीप हंगामातील महत्वाची पिके आहेत. दरवर्षी तालुक्यात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. यावर्षी अनेक भागात पेरणीस पावसाअभावी उशीर झाला. तर आधुन-मधून काहीकाळ पडणाºया पावसावर पिकांनी तग धरली; परंतु, कापसासह फळ बागायती पिकांना हुमनी अळीचा मोठा प्रादूर्भाव दिसून येत आहे. खरिपातील पिकांसोबत ही अळी फळबाग, ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे.
जून महिन्यात पाऊस हवा तसा बसरला नाही. त्यापाठोपाठ जुलै महिनाही रिमझिम पावसावरच कोरडा गेला. यामुळे पेरलेली पिकांनी जमिनीच्यावर कसेबसे डोके काढले. अल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे प्रौढ भुंग्यांनी जमिनीत घातलेल्या अंडीला पोषक वातावरण मिळत गेले. यामुळे त्याची बारीक पिल्ले सध्या फळबाग, ऊस, हळद व कापूस पिकांची मुंळ नष्ट करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर पडली आहे.
या कराव्यात : उपाययोजना
४सध्याच्या परिस्थितीत बºयाच ठिकाणी हुमनीच्या लहान-लहान अळ्या दिसून येत आहेत. त्याकरीता सर्व पिकातील हुमनी अळीच्या व्यवस्थापनासाठी मेटाराईझियम अ‍ॅनोसोपफली या जैविक बुरशीचा चार किलो प्रति एकर जमिनीत वापर करावा.
४सद्यस्थितीतील वातावरण बुरशीनाशकाचा वापर करण्यासाठी चांगले आहे. विशेष म्हणजे ही जैविक बुरशी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात उपलब्ध असल्याची माहिती प्रा.डी.डी.पटाईत यांनी दिली.

Web Title: Parbhani: Influence of Humani aloe on crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.