परभणी : आरोग्य शिबिरात दोन हजार रुग्णांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 12:33 AM2017-12-11T00:33:25+5:302017-12-11T00:33:35+5:30
शिवसेनेच्या वतीने शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये १० डिसेंबर रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़ या शिबिरात २ हजार रुग्णांची मोफत तपासणी करून उपचार करण्यात आले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शिवसेनेच्या वतीने शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये १० डिसेंबर रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़ या शिबिरात २ हजार रुग्णांची मोफत तपासणी करून उपचार करण्यात आले़
आ़डॉ़राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून शिवसेनेच्या वतीने शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये प्रभावती नगरातील भारतीय बाल विद्या मंदिर येथे स्व़बाळासाहेब ठाकरे मोफत आरोग्य तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते़ या शिबिराचे उद्घाटन आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या हस्ते झाले़ यावेळी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, उपजिल्हाप्रमुख संजय गाडगे, गटनेते चंदू शिंदे, ज्ञानेश्वर पवार, प्रभारी शल्यचिकित्सक डॉ़ एसक़े़ मुंडे, आऱएम़ काजी, अंबिका डहाळे, बाळराजे तळेकर, विशू डहाळे, अनिल डहाळे, विश्वास कºहाळे, डॉ़विक्रम पाटील, डॉ़अर्चना गोरे, प्रा़डॉ़रामकृष्ण काळे, मनोज पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती़ या शिबिरामध्ये २ हजार रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली़ शिवाय २०० रुग्णांची रक्त तपासणी करून असाध्य रोगाच्या रुग्णांना अॅलोपॅथिक, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक पथकाच्या वतीने उपचार करण्यात आले़ या रुग्णांना मोफत औषधींचे वाटप करण्यात आले़
या शिबिरामध्ये त्वचारोग तज्ज्ञ डॉ़आऱएस़ शर्मा, डॉ़ अर्चना भुसेवार, डॉख़ंदारे, डॉ़अर्चना गोरे, डॉ़बाळासाहेब कदम, डॉ़विशाल पवार, डॉ़सागर मोरे, डॉ़शिल्पा टाके, डॉ़तेजस कांबळे, डॉ़सूर्यकांत नवघरे, डॉ़शिल्पा मालपाणी, डॉ़एस़ नागशेट्टेवार, डॉ़एस़ कोल्हे, डॉ़एम़ अन्सारी, डॉ़एस़ देशमुख, डॉ़एल़ माघाडे आदींनी रुग्णांची तपासणी केली़ अभय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले़ यशस्वीतेसाठी राहुल खटींग, उपशहर प्रमुख गणेश मुळे, सचिन गारुडी, स्वप्नील भारती, मकरंद कुलकर्णी, गौरव तपके, रामेश्वर आवचार, पवन पारखे आदींनी प्रयत्न केले़
प्रत्येक भागात आरोग्य शिबीर घेणार- पाटील
गोरगरीब लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे़ शहरातील प्रत्येक भागात अशा प्रकारचे आरोग्य शिबीर घेऊन आरोग्य सेवा दिली जाईल, असे उद्घाटन प्रसंगी आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी सांगितले़