परभणी : आंतरराष्ट्रीय भाषा अभ्यासक्रमास मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:46 AM2018-12-03T00:46:13+5:302018-12-03T00:46:22+5:30

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परभणी येथील उपकेंद्रात पुढील शैक्षणिक वर्षापासून आंतरराष्ट्रीय भाषा अभ्यासक्रमास विद्यापीठाने मंजुरी दिली असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली.

Parbhani: International language course approved | परभणी : आंतरराष्ट्रीय भाषा अभ्यासक्रमास मंजुरी

परभणी : आंतरराष्ट्रीय भाषा अभ्यासक्रमास मंजुरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परभणी येथील उपकेंद्रात पुढील शैक्षणिक वर्षापासून आंतरराष्ट्रीय भाषा अभ्यासक्रमास विद्यापीठाने मंजुरी दिली असल्याची माहिती आ.डॉ.राहुल पाटील यांनी दिली.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात स्वारातीम विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्रासाठी विविध अभ्यासक्रमास विद्यापीठाने मंजुरी दिली आहे. या अनुषंगाने उपकेंद्रामध्ये २ डिसेंबर रोजी आ.डॉ.राहुल पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.उद्धवराव भोसले, वनामकृविचे कुलगुरु डॉ.अशोक ढवन, अ‍ॅड.अशोक सोनी, डॉ.रमजान मुलानी, डॉ.गोविंद कत्तलाकुटे, डॉ.वसंत भोसले, डॉ.बी.यू. जाधव, डॉ.अंबादास कदम, नारायण चौधरी, अरुण पाटील, संजय गाजरे, संजय डाके, संतोष धामणे आदींची उपस्थिती होती.
या उपकेंद्रामध्ये २०१९-२० या शैक्षणिक वर्षापासून स्पॅनिश, फ्रेंच भाषा, डिप्लोमा इन जीएसटी, डिप्लोमा इन सायबर, डिप्लोमा इन शेअर मार्केटिंग, अ‍ॅग्रोबेस इंडस्ट्रीज प्रमाणपत्र कोर्स, डिप्लोमा इन डिजॅस्टर मॅनेजमेंट, डिप्लोमा इन इन्व्हॉरमेंट सायन्स हे एक वर्षाचे अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहेत. तसेच एम.कॉम. इंग्रजी माध्यम आणि एम.ए. प्रशासकीय सेवा हे अभ्यासक्रमही सुरु करण्यात आले आहेत, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. या अभ्यासक्रमांसाठी लागणारा प्राध्यापकवर्ग, कर्मचारी आणि भौतिक सुविधा देण्याबाबतचा विषय व्यवस्थापन परिषदेकडे वर्ग करण्यात आला आहे.

Web Title: Parbhani: International language course approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.